Sugarcane Management : उसामध्ये योग्य पद्धतीने आंतरपिकांची निवड

Sugarcane Management : उसामध्ये योग्य पद्धतीने आंतरपिकांची निवड

Sugarcane Management : उसामध्ये योग्य पद्धतीने आंतरपिकांची निवड

Sugarcane Cultivation : ऊस लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून चार महिन्यांच्या आत परिपक्व होणाऱ्या पिकाची निवड करावी. आंतरपीक हे जास्त उंचीचे आणि ऊस पिकासोबत स्पर्ध करणारे नसावे. हंगामनिहाय योग्य पिकाची आंतरपीक म्हणून निवड करावी.

Sugarcane Intercropping : ऊस लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून चार महिन्यांच्या आत परिपक्व होणाऱ्या पिकाची निवड करावी. आंतरपीक हे जास्त उंचीचे आणि ऊस पिकासोबत स्पर्ध करणारे नसावे. हंगामनिहाय योग्य पिकाची आंतरपीक म्हणून निवड करावी.

आंतरपीक पद्धती हा पीक पद्धतीतील महत्त्वाचा घटक आहे. आंतरपीक पद्धती म्हणजे मुख्य पिकामध्ये किंवा मुख्य पिकाच्या मधल्या पट्ट्यामध्ये दुय्यम पिकाची योग्य अंतरावर केलेली लागवड होय. यामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये मुख्य पिकावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चाचा ताण कमी करून दुय्यम पीक पद्धतीतून चांगले उत्पादन मिळते. त्यामुळे मुख्य पीक काही कारणास्तव हाती आले नाही, तरी दुय्यम म्हणजेच आंतरपीक पद्धतीतून काही प्रमाणात झालेला खर्च भरून काढला जातो. त्यामुळे शाश्‍वत शेतीसाठी आंतरपीक पद्धती आवश्यक आहे.
उसामध्ये द्विदलवर्गीय आंतरपीक पद्धतीमुळे जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण होते. चवळी, मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा, भुईमूग, वाटाणा, ताग व मेथी या पिकांमधून मोठ्या प्रमाणात नत्र स्थिरीकरण होण्यास मदत होते. आंतरपीक पद्धतीमुळे ऊस पिकाची नत्राची गरज कमी होऊन रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होतो. आंतरपिके जमिनीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्यांचे शोषण करून पिकास उपलब्ध करून देतात. त्यामुळे अन्नद्रव्यांचा समतोल राखला जातो. तसेच जमिनीतील अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होऊन सेंद्रिय कर्ब वाढीस लागतो. त्यासाठी ऊस लागवडीमध्ये आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरते.Sugarcane Management : उसामध्ये योग्य पद्धतीने आंतरपिकांची निवड

उसातील हंगामनिहाय आंतरपिके :

१) आडसाली ऊस :
खरीप हंगामात भुईमूग, चवळी, सोयाबीन, मूग, उडीद, मटकी. मेथी, कोथिंबीर व पालक ही भाजीपाला वर्गीय पिके. हिरवळीच्या पिकामध्ये धैंचा व ताग.

२) पूर्वहंगामी ऊस :
बटाटा, कांदा, लसूण, शर्कराकंद, पानकोबी, फुलकोबी वाटाणा, हरभरा आणि गहू.

३) सुरू ऊस :
भुईमूग, कांदा, काकडी, खरबूज, कलिंगड तसेच उन्हाळी भाजीपाला वर्गीय पिके.

आंतरपिकासाठी ऊस लागवड पद्धत :

१) रुंद सरी किंवा पट्टा पद्धत :
या पद्धतीमध्ये दोन सरीतील अंतर साधारणतः ४ ते ६ फुटांपर्यंत वाढवून जमिनीच्या प्रकारानुसार मधल्या पट्ट्यात २ ते ३ ओळी पेरणी किंवा टोकन पद्धतीने आंतरपिकांची लागवड करावी.

२) जोड ओळ किंवा एकाआड एक सरी पद्धत :
यामध्ये सलग २.५ ते ३ फुटांच्या सऱ्या सोडून एका सरीमध्ये ऊस लागण तर दुसऱ्या सरीतील वरंब्याच्या दोन्ही बाजूंना आंतरपिकाची टोकण करावी.

मुख्य बाबी :

  • आंतरपीक हे मोठ्या बांधणीच्या अगोदर (चार महिन्यांच्या आत) पक्व होणारे असावे.
  • आंतरपीक जास्त उंचीचे व ऊस पिकास स्पर्धा करणारे नसावे.
  • आंतरपिकांना मुख्य ऊस पिकाव्यतिरिक्त शिफारशीनुसार खतमात्रा द्याव्यात.
  • स्पर्धा करणारी तसेच ऊस कुळातील एकदल पिके (मका ज्वारी इ.) यांची लागवड टाळावी. ऊस हे एकदलवर्गीय पीक आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून एकदल वर्गीय पीक घेतल्यास दोन्ही पिकांची अन्नद्रव्य, पाणी व सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होते. त्याचा ऊस पिकाच्या वाढीवर आणि फुटव्यांवर परिणाम होऊन उत्पादनात घट
    येण्याची शक्यता असते. द्विदलवर्गीय पिकामुळे मोठ्या प्रमाणात नत्राचे स्थिरीकरण होऊन ऊस पिकातील नत्राची आवश्यकता पूर्ण करता येते.Sugarcane Management : उसामध्ये योग्य पद्धतीने आंतरपिकांची निवड
  • तण नियंत्रणासाठी ऊस व आंतरपीक या दोन्हींसाठी योग्य असलेल्या तणनाशकाची निवड करावी.

आंतरपिकांची निवड :

पीक—वाण—लागवड अंतर—खतमात्रा (नत्र: स्फुरद: पालाश) प्रति हेक्टरी—पीक कालावधी (दिवस)—उत्पादन (क्विंटल प्रति हेक्टरी)

अ) आडसाली ऊस :

१) चवळी—कोकण सदाबहार (व्ही.सी.एम.-८) कोकण सफेद, फुले पंढरी, फुले विठाई—४५ बाय १० सेंमी—२५: ५० : ०० किलो (डीएपी १२५ किलो)—६० ते ७५—६ ते ७
२) ताग, धैंचा (हिरवळीची पिके)—स्थानिक किंवा देशी वाण—३० बाय ५ सेंमी (पेरणी किंवा हाताने टाकावे)—पेरणीवेळी डीएपी १०० किलो—४५ ते ५५ (पीक फुलोरा अवस्थेत असताना जमिनीत गाडावे)—एकरी ८ ते १० टन हिरवळीचे खत

ब) पूर्व हंगामी :

१) हरभरा—विजय, विशाल, दिग्विजय, विराट, आकाश, फुले विक्रम—३० बाय १० सेंमी—२५: ५० : ३० किलो (डीएपी १२५ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो पेरणीवेळी)—१०० ते ११०—८ ते १०
२) गहू—त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, पंचवटी, नेत्रवती, पुसा सदाबहार, फुले समाधान—दोन्ही ओळींतील अंतर २० सेंमी—१२०: ६०: ४० किलो—११० ते १२०—१२ ते १५
३) शर्कराकंद—शुभ्रा (एचआय ००६४ ), पीएसी ६००८, एसझेड ३५, एलएस ६—५० बाय २० सेंमी—१२०: ६०: ६० किलो—१५० ते १८०—३५ ते ४० टन
४) कांदा—खरीप ः फुले समर्थ, बसवंत ७८०, ॲग्रीफाउंड डार्क रेड, रांगडा ः फुले समर्थ, बसवंत ७८०, एन-२-४-१, उन्हाळी ः एन-२-४-१, ॲग्रीफाउंड लाइट रेड—१५ बाय १० सेंमी—१००: ५०: ५० किलो—१२० ते १५०—१०० ते १२५ क्विंटल
५) लसूण—फुले नीलिमा, फुले बसवंत, गोदावरी, श्‍वेता, यमुना सफेद—१५ बाय १० सेंमी—५०: ५०: ५० किलो—१३० ते १५०—४ ते ५ टन
६) बटाटा—कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, कुफरी सूर्या (महाराष्ट्रातील मैदानी भागाकरिता)—६० बाय २० सेंमी—१००: ६०: १२० किलो—९० ते १००—१० ते १५ टन
७) पानकोबी—गोल्डन एकर, इतर संकरित वाण—४५ बाय ३० सेंमी—१६०: ८०: ८० किलो—जातीपरत्वे ६५ ते ८०—१२ ते १५ टन
८) फुलकोबी—खरीप : पुसा दीपाली, पुसा केतकी, रब्बी ः पुसा सिन्थेटिक, स्नोबॉल १६, के १—६० बाय २० सेंमी—४५ बाय ४५ सेंमी—१५०: ७५: ७५ किलो—जातीपरत्वे ७० ते १००—१० ते १२ टन
९) जवस—किरण, एनएल ९७—४५ बाय १० सेंमी—३० बाय १० सेंमी—६०: ३० :०० किलो—१०० ते ११०—२ ते ३
१०) वाटाणा—बोनव्हीला, अरकेल, फुले प्रिया—३० बाय १५ सेंमी—१५: ६०: ६० किलो—८० ते १००—२ ते ३ टन हिरव्या शेंगा Sugarcane Management : उसामध्ये योग्य पद्धतीने आंतरपिकांची निवड

क) सुरू ऊस :

१) उन्हाळी भुईमूग—टी.ए.जी. २४, टी. जी. २६—३० बाय १० सेंमी—२५: ५० : ०० किलो, जिप्सम ४०० किलो (पेरणीवेळी २०० किलो, आऱ्या सुटताना २०० किलो)—९० ते ११०—८ ते १०
२) कलिंगड—शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती—२ बाय ०.५ मी—५०: ५०: ५० किलो—९० ते १२०—२० ते २५ टन
३) खरबूज—पुसा सरबती, हरामधू व इतर संकरित वाण—१.५ ते १ मी—५०: ५०: ५० किलो—८० ते १००—१० ते १२ टन
४) मेथी—पुसा अर्ली बंचिंग, कसुरी—दोन्ही ओळींतील अंतर १० सेंमी—१०: ४०: २० किलो—जातीपरत्वे ४० ते ६०—३ ते ४ टन
५) पालक—पुसा ज्योती, ऑलग्रीन—दोन्ही ओळींतील अंतर १५ सेंमी—४०: ४०: ४० किलो—९० ते ११५—७ ते ८ टन
६) काकडी—हिमांगी, फुले शुभांगी—१ बाय ०.५ मी.—१००: ५०: ५० किलो—८० ते ९०—७ ते ८ टन
७) झेंडू—पुना नारंगी गेंदा, कलकत्ता झेंडू यलो, कलकत्ता झेंडू ऑरेंज, रेडहेड—६० बाय ६० सेंमी—४५ बाय ४५ सेंमी—१००: १००: १०० किलो—१३० ते १५०—५ ते ७ टन फुले Sugarcane Management : उसामध्ये योग्य पद्धतीने आंतरपिकांची निवड