
राज्याच्या सीमा या डोंगररांगा, नद्या यांसारख्या नैसर्गिक किंवा भौगोलिक घटकांवर ठरवतात, ज्यामुळे अशा सीमावरती भागातील पशुधन, लगतच्या भूप्रदेशातील पशुधनाच्या संकरातून निपजले जाते. दोन भिन्न पशुधनाचे बाह्य गुण किंवा रंगरूप एकत्रित रित्या दिसत असल्याने त्याच्याकडे मिश्र, गावठी किंवा अवरणीत ( नॉन डिस्क्रिप्ट ) म्हणून बहुगुणी पशुध न दुर्लक्षित राहते. वास्तविक असे सीमा वरती भागातील पशुधन हे जमिनीतील मूलद्रव्य, हवामान, चारापाणी अशा अनेक वर्षाच्या नैसर्गिक परिणामातून घडलेली असते. महाराष्ट्राच्या सीमावरती भागात असे मिश्र पशुधन सहज पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्रातील गुजरात राज्यालगत असलेले आणि दिसायला काही डांगी गोवंशासारखे पण शरीर याष्टीने लहान बांध्याचे असणारे सोनखेरी हे महत्त्वाचे अवर्णीत गोधन आहे. 1953 मध्ये प्रा .एल.बी. कुलकर्णी यांनी खानदेशातील सोनखेरी गावावरून ओळखल्या जाणाऱ्या सोनखेरी गोवशाबद्दल आपल्या पुस्तकात नोंद असल्याचे सोनखेरी गोवंशचे स्थानिक अभ्यासक धीरज कुमार सोनवणे सांगतात.
Sonkheri Cow|शेतीकामासाठी कणखर सोनखेरी गोवंश
स्थानिक पातळीवर गुराखी साधारण 20 ते 50 सोनखेरी गाईंचा कळप चराईसाठी घेऊन जातो. पावसाळ्याच्या दिवसात केवळ तात्पुरता निवारा उभारण्याकडे गोपालकांचा कल दिसून येतो,एरवी हे पशुधन मुख्य संचार पद्धतीने वावरते . नवजात वासरू चारा खाणे सुरु करे पर्यंत दुध पाजले जाते. धुळे, पिंपळनेर, चाळीसगाव, शहादा,दोडाईचा,नावापुर ,शिरपूर अशा स्थानिक बाजारपेठेत सोनखेरी गोवंशाची खरेदी विक्री होताना दिसते.टणक खुरांमुळे अधिक पर्जन्य छायेतील भागात शेती कामासाठी उपयुक्त ठरते. एका कुटुंबासाठी गरजेपुरते दूध,शेणखत आणि शेतीकाम अशा तिहेरी कामांसाठी उपयुक्त असल्याने सोनखेरी गोवंश स्थानिक पशुपालकांत विशेष लोकप्रिय आहे.Sonkheri Cow|शेतीकामासाठी कणखर सोनखेरी गोवंश
गोवंशाची ओळख
- साधारणत तापी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात निपजलेल्या या सोनखेरी गोवंशाचा सांभाळ स्थानिक भिल्ल, कोकणी, मावची, पावरा अशा गोपालकाकडून होत आहे.Sonkheri Cow|शेतीकामासाठी कणखर सोनखेरी गोवंश
- निमारी (मध्य प्रदेश ),गीर( गुजरात), डांगी आणि देवणी ( महाराष्ट्र )अशा लोकप्रिय गोवंशाच्या तुलनेत रोग प्रतिकारक क्षमता,विषम वातावरनात तग धरण्याची क्षमता, उपलब्ध चराई क्षेत्रामध्ये गुजराण करीत दूध उत्पादन देण्याची क्षमता या गुणांमुळे सोनखेरी गोवंश स्थानिक पशुपालकांत आपली लोकप्रियता टिकून आहे.
- तपकिरी,काळा,पांढऱ्या,किवा यांच्या मिश्र रंगसंगतीमध्ये सोनखेरी गोवंश दिसतो. चाकाकंत्या तपकिरी रंगाने एक प्रकारची सोनेरी झळाळी असल्याचा भास होतो म्हणून डांगी आणि निमारी यांच्या संकरातून उत्क्रांत झालेली सोनखेरी गुजरात लगतच्या भागात धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सोनकी या नावाने परिचित आहे.
- तपकिरी रंगाच्या गाईच्या मानेवर अनेकदा काळपट पट्टे दिसतात. त्यांना बोलीभाषेत ‘वाघ्या’ म्हटले जाते.तपकिरी रंगाच्या गाईना ‘सोनखेरी’ आणि गडद तपकिरी रंगाच्या गाईना कालखेरी म्हणतात .
- सपाट कपाळमाथा वर जाणारी मजबूत आणि आखूड शिंगे तसेच टणक खुरे,कान मध्यम आकाराचे असून आतल्या बाजूने पवळसर रंगाचे असतात. उजळ गुलाबी रंगाची कास आणि तेलकट कातडी ही सोनखेरीची लक्षणे आहेत.
- नाक पूद्याचा रंग काळा व क्वचित फिकट तपकिरी असतो.मानेची पोळी आणि वशिंड मध्यम आकाराचे असते. काही गोवंशाच्या कपाळावर निंबोरी आढळते गडद रंगाच्या जनावरांवर पाठीचा मणका मात्र उजळ रंगाचा दिसतो. Sonkheri Cow|शेतीकामासाठी कणखर सोनखेरी गोवंश
- गाईची अर्धा ते एक लिटर दूध उत्पादनाची सरासरी आहे. काही गाई प्नति दिन 2.5 ते 3 लिटर दूध उत्पादन देतात. मात्र अशा गोधनाची पशुपालका कडून स्थानिक गोधना सोबत आंतर पैदास होत असल्याने शुद्ध सोनखेरीची संख्या पैदास क्षेत्रात कमी होत आहे. एका वेतात सरासरी 500 ते 600 किलोग्रॅम इतके दूध उत्पादन होते.