पिकांचे व शेत जमिनीच्या प्रत्येक भागाचे अचूक निरीक्षण करता आले तरच आपल्याला काटेकोर शेती करणे शक्य आहे. आज वरची पारंपरिक शेती ही मानवी संवेदनावर आधारित निरीक्षणे आणि निष्कर्ष वर अवलंबून होती. त्यामध्ये व्यक्ती साक्षरतेप्रमाणे अनेक मर्यादा पडतात. अशा वेळी भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएस(GIS) आणि दूर संवेदन(RS) आरएस या सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या मदतीला येऊ शकते.

Remote Sensing & GIS|शेतीसाठी दूर संवेदन ,भौगोलिक माहिती प्रणाली
दूर संवेदन म्हणजे काय ?
दुर संवेदन (रिमोट सेन्सिंग Remote Sensing ) मध्ये पृथ्वी किंवा अवकाशातील विविध घटकांची ,भूभागाची, हवामानाची किंवा जमिनीवर उपलब्ध पाणीसाठे, वनस्पतीची माहिती अवकाशातून उपग्रह, ड्रोन, विमान किंवा सेंन्सर च्या मदतीने मिळवली जाते . उदा. हवामान उपग्रहाने काढलेले फोटो, जमीन मोजणारे व पिकाची स्थिती निरीक्षण करणारे ड्रोन सर्वेक्षण, समुद्रातील पाण्याचे तापमान मोजणे इ.Remote Sensing & GIS|शेतीसाठी दूर संवेदन ,भौगोलिक माहिती प्रणाली
दूर संवेदनांमध्ये प्रामुख्याने उपग्रह प्रतिमा (सॅटेलाइट इमेज) आणि हवाई छायाचित्रे (एरियल फोटो) यांचा वापर केला जातो त्यासोबतच अन्य संवेदके उदा. लीडार, थर्मल, इन्फ्रारेड आणि मिल्टी स्पेक्ट्रल इ. चा वापर करून माहिती गोळा केली जाते.
भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय ?
भौगोलिक माहिती प्रणाली( जीआयएस जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम Geographic Information System) ही एक संगणक प्रणाली असून, ती जमिनीशी संबंधित म्हणजेच भौगोलिक माहिती साठवते. त्याचे विश्लेषण करते आणि ती माहिती नकाशा स्वरूपात दाखवते. यामध्ये विविध प्रकारची माहिती वेगवेगळ्या थरांच्या (लेअर्स Layers) स्वरुपात ठेवली जाते. उदा. गावाचे नकाशे, त्यातील रस्ते नकाशे, जमीन वापर पॅटर्न, नाले-नद्यांचे जाळे, लोकसंख्येची घनता, घेतल्या जाणारे पिकांचे प्रकार इ. माहिती वेगवेगळ्या थरांमध्ये एकावर ठेवून जोडून पाहता येते. त्यावरून महत्त्वाचे निष्कर्ष काढता येतात.
आर एस आणि जीआयएस कसे काम करते ?
दूर संवेदन आणि भौगोलिक प्रणाली या दोन्ही प्रणाली एकमेकांना पूरक असून एकत्रितपणे काम करतात. त्यातील माहिती व आकडेवारीच्या संकलनासाठी दूर संवेदनाची मदत घेतली जाते. दूर संवेदन तंत्तार उपग्रह किवा ड्रोनने प्रतिमा , तापमान, आद्रता, पिकांची स्थिती, जंगलातील बदल अशी माहिती घेते. मिळालेल्या माहितीवर
- माहिती प्रक्रिया: मिळालेल्या प्रतिमा व मोजमापांना संगणक प्रणाली द्वारे प्रक्रिया करून उपयुक्त स्वरूपात बदलले जाते.
- भौगोलिक माहिती प्रणाली मध्ये माहिती एकत्रितकरण: आलेली प्रत्येक ठिकाणची स्थानिक माहिती भौगोलिक माहिती प्रणाली मध्ये थर किवा स्तरामध्ये साठवली जाते. त्यामुळे एकावर एक थर ठेवत आपल्याला अन्य सर्व माहितीची तुलना करता येते, भौगोलिक माहितीशी इतर माहिती (उदा. लोकसंख्या,रस्ते, हवामान, पाणी स्त्रोत इ.) जोडता येते.
- विश्लेषण : भौगोलिक माहिती प्रणालीच्या मदतीने आकडेवारीचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यानंतर निर्देशकांचा अभ्यास करून “कोणत्या भागात पिके नीट वाढली आहेत?” ” पोराचा धोका कुठे आहे?” “शहरांची वाढ कुठे जास्त झाली आहे?” अशा प्रश्नांची उत्तरे मिळवता येतात.
- परिणामकारक सादरीकरण: विश्लेषणातून काढलेला निष्कर्षाचे सादरीकरण नकाशे,आलेख किंवा अहवाल स्वरूपात केले जाते. त्यामध्ये सर्वसामान्यांपासून शेतकरी, शास्त्रज्ञ, शहरी नियोजक, आपत्ती व्यवस्थापन विभाग इ. त्याचा वापर करू शकतात. उदा. एखाद्या भागात पूर आला असल्यास दूर संवेदनाच्या द्वारे उपग्रह प्रतिमा मिळवून कोणते भाग पाण्याखाली गेले हे समजते. पण भौगोलिक माहिती प्रणालीमध्ये विश्लेषणानंतर नकाशावर पुराचे पाणी पसरलेले पाहून, त्या भागातील प्रभावित लोकसंख्या, रस्ते, पिके यांची माहिती घेता येते. त्यानुसार योग्य त्या उपाययोजना करता येतात.
काटेकोर शेतीसाठी ‘जीआयएस’ चे उपयोग
भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) द्वारे तयार केलेले भौगोलिक नकाशे, उपग्रह चित्रे, जमिनीची मोजमापे व संबंधित आकडेवारीचा वापर करून आपल्या शेती व परिसराची योग्य ती माहिती उपलब्ध होते. उदा. शेतीतील मातीचा प्रकार, भूप्रदेश, जलस्रोत, पिकांची सद्यस्थिती इ.Remote Sensing & GIS|शेतीसाठी दूर संवेदन ,भौगोलिक माहिती प्रणाली
- आपल्या जमिनीतील मातीचा प्रकार,सामू (पी एच ) मूल्य सेंद्रिय घटकांची मात्रा इ. घटकांचे अचूक भूस्थानीक नकाशे भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे तयार करता येतात. त्यातून योग्य प्रकारची निवड आणि खतांची अचूक नियोजन शक्य होते.
- शेतातील उंच सखल भूभागांचे विश्लेषण करून पाणी प्रवाहाचा अंदाज घेता येतो.त्यानुसार ठिबक सिंचन (ड्रिप इरिगेशन) किंवा फवारा सिंचन( स्प्रिंकलर) प्रणालीचे नियोजन सुलभ होते.
- उपग्रह व ड्रोन प्रतिमांच्या विश्लेषणातून पिकांची वाढ, रोगांची लक्षणे किंवा पोषण तुतीचा शोध घेता येतो. वेळेत उपायोजना करता येतात.
- ऐतिहासिक आकडेवारीचा आणि हवामानाच्या माहितीची जोड देत आगामी हंगामातील पीक उत्पादनाचा अंदाज वर्तवता येतो.
- पिकाच्या वाढीशी जमिनीतील अन्नद्रव्यांची किंवा कीड-रोग प्रादुर्भावाची सांगड घालून योग्य ते नियोजन करता येते. प्रमाणिक कोणत्या हवामानात कीड रोग येणार याची याचाही अंदाज मिळू शकतो.
फायदे
- काटेकोर शेती मध्ये आर एस जी एस (RS-GIS) चा वापर केल्यास शेतकऱ्यांना अचूक निर्णय घेणे सोपे जाते.
- संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि निर्विष्ठांची बचत शक्य.
- योग्य व्यवस्थापनेमुळे उत्पादनात वाढ होते.
- अतिरिक्त खते, कीडनाशकांच्या वापराचे वातावरणातील दुष्परिणाम कमी करणे शक्य.
- पुनश्च काही काळाने माहिती घेऊन केलेल्या उपाययोजनांची कार्यक्षमता तपासणी शक्य.
- माती, पाणी, हवामान पिकांची माहिती एकत्र करून त्याचा प्रभावी उपयोग केल्यास ती शेती उत्पादन क्षमता आणि नफा दोन्ही वाढवता येतात.