Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे

विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.अलीकडच्या काळात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा (New Technology) वापर वाढला. याशिवाय रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापरही वाढलेला आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ जरी होत असली तरी मिळणारी उत्पादने ही रसायनयुक्त मिळत आहेत. त्यामुळे मानवामध्ये विविध आजारांत वाढ झालेली आहे. त्यामुळे विषमुक्त व रसायनविरहित अन्नधान्य, भाजीपाला आणि फळपिके घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे. जी लहान शेतकर्‍यांसाठी फायदेशीर आणि उपयुक्त आहे. सेंद्रिय शेतीत उपलब्ध असलेल्या आणि कमी निविष्ठांमध्ये शेती करता येते. सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये आणि आवश्यक घटक काय आहेत याबाबत माहिती घेऊया.

Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे २०२५

Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे

सेंद्रिय शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवणे, मातीचे आरोग्य सुधारणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे शक्य आहे. या तंत्रज्ञानात, खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिकरित्या वापर, जलव्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापनाचा समावेश आहे.Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे


सेंद्रिय शेतीत नवीन तंत्रज्ञान:

खत व्यवस्थापन:
कंपोस्ट खत, वर्मीकंपोस्ट आणि जीवाणू खत यांचा वापर मातीची सुपीकता वाढवण्यासाठी केला जातो.

कीड नियंत्रण:
नैसर्गिक कीड नियंत्रण (उदाहरणार्थ, सापळा पिके, मित्र कीटकांचा वापर) आणि जैविक कीडनाशकांचा वापर करून पिकांचे संरक्षण केले जाते.

जल व्यवस्थापन:
जलव्यवस्थापनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा (उदाहरणार्थ, सूक्ष्म सिंचन) वापर करून पाण्याची बचत आणि पिकांची वाढ सुधारता येते.

पीक व्यवस्थापन:
पीक रोटेशन, मिश्र पीक पद्धत आणि योग्य बियाण्यांचा वापर करून पीक उत्पादन वाढवता येते.

माती व्यवस्थापन:
मातीची धूप आणि घट कमी करण्यासाठी मातीचे संरक्षण, मातीची जैविक क्रिया वाढवणे आणि नैसर्गिकरित्या मातीची सुपीकता वाढवणे यावर लक्ष केंद्रित केले जाते.

तंत्रज्ञान:
स्मार्ट शेती, ड्रोन, मोबाईल ॲप्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्‌स (IoT) यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवस्थापन सुधारता येते.

प्रशिक्षण:
शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती आणि नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आयोजित करणे, ज्यामुळे ते सेंद्रिय शेती अधिक प्रभावीपणे करू शकतील.

Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे २०२५

उत्पादन प्रक्रिया:

सेंद्रिय उत्पादनांची प्रक्रिया आणि पॅकिंग सुधारण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.


उत्पादन आणि विक्री:

सेंद्रिय उत्पादनांची ऑनलाइन विक्री आणि मार्केटिंग करणे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.
सेंद्रिय शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवता येते, मातीचे आरोग्य सुधारता येते आणि पर्यावरणाचे संरक्षण करता येते .Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे

१) मृदासंवर्धन – रसायनांचा वापर थांबविणे, पिकाचे अवशेष उपयोगात आणणे, सेंद्रीय आणि जैविक खताचा उपयोग करणे, आंतरपीक आणि बहु-पीक पद्धतीचा अवलंब करणे, जास्त नांगरणी न करणे. जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी जमिन सतत हिरव्‍या किंवा ओल्‍या गवताने आच्छादीत राहील यासाठी प्रयत्न करणे इ. बाबी मृदासंवर्धनासाठी आवश्यक आहेत.

२) पावसाच्या पाण्याचे संवर्धन – पाझर तलाव, शेततळे खोदने, उताराच्या जमिनीला बांध घालणे. बांधावर कमी उंचीचे वृक्षारोपण करणे.

३) निविष्ठांची निर्मिती – पिकासाठी लागणाऱ्या निविष्ठांची स्वतः निर्मिती करणे यामध्ये घरचेच बियाणे वापरणे, कंपोस्‍ट, व्हर्मीकंपोस्‍ट, व्हर्मीवॉश, द्रव खते आणि वनस्पती अर्क तयार करणे इ. बाबींचा समावेश होतो.

४) जैवविविधता – पक्षीथांबे उभारणे, मधमाशा, तसेच उपयुक्त किटकांचे संवर्धन करुन शेतातील जैवविविधता टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे.

५) पशुपालन – जनावरे ही सेंद्रिय व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण घटक आहेत. जनावरांपासून दुधाव्यतिरिक्त शेण आणि मूत्र मिळते. जे सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते.

६) सौरउर्जेचा वापर – जास्तीत जास्त सौरउर्जेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर करणे. बायोगॅस आणि बैलांद्वारे चालविण्‍यात येणारे पंप, जनरेटर इं. यंत्राचा वापर करणे

सेंद्रिय शेतीची तत्त्वे

आरोग्‍याचे तत्त्व
हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून मानवाचे आरोग्य वाढते.Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे

पर्यावरणीय तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी. ती जीवसृष्टीला धरून चालणारी हवी. यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.

निष्पक्षतेचे तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजूस कलणारी नसावी, निष्‍पक्षतेची खात्री देणारी असावी.

संगोपनाचे तत्त्व
यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरीत्या व्हावयास हवे. परिणामी, या व पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य व कल्याण योग्य रितीने राखले जाईल.

Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे २०२५

वैशिष्ट्ये

  • मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.
  • पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
  • निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी, अनैसर्गिक वस्तू, निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके, रासायनिक पदार्थ, जीएमओ इत्यादी) उपयोग न करणे.
  • उत्पादनात वैविध्य
  • शेतीवर अवलंबून असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते. पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
  • अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
  • आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
  • एकमेकाशी निगडित पद्धती
  • सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
  • सेंद्रिय शेतीमध्ये पाळीव प्राण्यांचाही उपयोग केला जातो.

सेंद्रिय खतांचे प्रकार

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे

शेणखत : गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.
कंपोस्ट खत :– शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.
हिरवळीचे खत :- लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. त्यापासून जमिनीला नत्र मिळते, जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात. गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीिरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो. मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
गांडूळ खत – ह्या खतात गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाची अंडीपुंज, बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.
माशाचे खत – समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ते. ह्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते.
खाटीकखान्याचे खत – खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.

Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे २०२५

सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे

नत्र पुरवठा:-
जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यांपासून मिळणारे खत (कोंबडीची विष्ठा), रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते-
जमिनीला ०.५ % ते १.० % सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते.(एक एकरात ८ टन कुजलेले शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ ०.५ % ने वाढतात.) जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांद्वारे केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

स्फुरद व पालाश:-
सेंद्रिय खतांमुळे झाडांना विविध अवस्थेत स्फुरद व पालाश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.

जमिनीचा सामू:-
सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल, विम्ल व क्षारयुक्त होत नाही.

कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी (CEC):
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती. सेंद्रिय खतांमुळे कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.

कर्बाचा पुरवठा:-
कर्ब किवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्याचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू झाडांना जमिनीतून अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात.

सेंद्रिय खतांचा परिणाम:
सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही. सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमानात जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे.सेंद्रिय खतांमुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यांत रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे

विविध टप्पे

शेतातील मातीचे संवर्धन व पोषण : रसायनांचा वापर बंद. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे. आधी घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने, बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर. पीक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे. अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
“‘तापमान अनुकूलन'” : शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे, जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही.Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे
पावसाच्या पाण्याचा व सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग : पाझर तलाव,शेत तळे तयार करणे, उताराच्या शेतीवर पायरी पद्धत.सारख्या उंचीचे बांध घालणे. सौर ऊर्जेचा वापर. जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.
नैसर्गिक साखळी, निसर्गचक्राचे पालन : जैववैविध्याची निर्मिती. कीटकनाशके न वापरणे.शेतीचे क्षेत्र, माती, हवामान यास अनुकूल असे पीक घेणे.जैविक नत्राचे स्थिरीकरण (ग्लिरिसीडिया वृक्षांची लागवड).
प्राण्यांचे एकीकरण : पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचा वापर, पशु-उत्पादन.सौर ऊर्जा, बायोगॅस इत्यादीचा वापर करणे.Organic Farming : सेंद्रिय शेतीची माहिती आणि फायदे
स्वावलंबन : स्वतःस लागणार्ऱ्या बियाण्यांचे उत्पादन. शेणखत, गांडूळखत, द्रव खते, वनस्पती अर्क इत्यादीचे स्वतःच उत्पादन करणे

भारतातील सेंद्रिय उत्पादनांची टक्केवारी
अ क्रमांक पीक टक्केवारी
1 उस 24
2 भात 24
3 फळे व भाजीपाला17
4 गहू 10
5 कापूस 8
6 बाजरी 10
7मसाले 5
8 कॉफी4
9 कडधान्य3
10काजू 3
कीटकांचा प्रतिबंध

योग्य निवड

  • रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणे. प्रतिरोधी बियाण्यांचा वापर, जैव विविधतेचे पालन.
  • आलटून पालटून वेगवेगळी पिके घेणे.
  • सापळा पिकांचा वापर करणे

शेतकी उपाय

  • पक्ष्यांच्या घरट्यांची स्थापना (पक्षी किड खाऊन टाकतात)
  • दिव्याचा सापळा,चिकट बश्यांचा वापर, कामगंध सापळे यांचा वापर.
  • कडुलिंबाच्या औषधांचा व निम तेलाचा वापर .

जैविक उपाय

  • कीटकभक्षक (परजीवी) जैविकांचा वापर
  • यजमान कीटकांचा वापर
  • उपयुक्त जैविक बुरशीचा वापर
  • वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर
  • अनेक वनस्पती ह्या कीडनाशक असतात. यांतील कडुनिंब सर्वात प्रभावी असते. कडुनिंबाच्या अर्काचा वापर हा कीटनियंत्रणात एक महत्त्वाचा घटक आहे. या अर्काने सुमारे २०० कीटकांचा उपद्रव नियंत्रणात येतो.
  • दशपर्णी अर्क वापरणे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1 .सेंद्रिय शेतीची उद्दिष्टे काय आहेत?

मातीचे जीवन, वनस्पती, प्राणी आणि लोक यांच्या परस्परावलंबी समुदायांचे आरोग्य आणि उत्पादकता अनुकूल करणे हे सेंद्रिय शेतीचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सेंद्रिय उत्पादनासाठी मुख्य मार्गदर्शक तत्त्वे नैसर्गिक प्रणालींचे पर्यावरणीय संतुलन वाढवणारी सामग्री आणि पद्धती वापरणे आहेत.


2. सेंद्रिय शेतीचे निरीक्षण म्हणजे काय?

सेंद्रिय शेतीसाठी मृदा व्यवस्थापन केंद्रस्थानी आहे, खोदणे, निरीक्षण आणि विश्लेषणाद्वारे तुमची माती समजून घेणे ही मातीच्या जैविक क्रियाकलापांना चालना देण्यासाठी आणि खनिज खतांच्या वापराची आवश्यकता असू शकतील अशा कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता नाही याची खात्री करण्यासाठी एक आवश्यक सुरुवात आहे.

3.शेतीचे महत्त्व काय आहे?
दैनंदिन जीवनात महत्त्व

हे अन्न, निवारा आणि वस्त्र प्रदान करण्यासाठी तसेच जगभरातील लाखो लोकांसाठी शाश्वत उपजीविका प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. पशुखाद्य, इंधन आणि औषध पुरवण्यासाठीही शेती आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, ते कापड, रसायने आणि कागद यासारख्या इतर उद्योगांद्वारे वापरलेला कच्चा माल पुरवतो.

4.सेंद्रिय शेतीचे निष्कर्ष काय आहेत?
सेंद्रिय शेतीचे फायदे

प्रदूषणाची पातळी कमी करून पर्यावरणाचे आरोग्य राखण्यास मदत होते. हे उत्पादनातील अवशेषांची पातळी कमी करून मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यास धोका कमी करते. हे कृषी उत्पादन शाश्वत पातळीवर ठेवण्यास मदत करते. यामुळे कृषी उत्पादन खर्च