
Sustainable Farming : शेती ही मुलत: अशीच एक शाश्वत प्रक्रिया आहे . ती नैसर्गिक संसाधने व साधन संपत्तीवरअवलंबून आहे , त्यांचा वापर ,विनियोजन आपण शाश्वतपणे करण्याची जरुरी आहे .शाश्वतपणे शेती करणे म्हणजे काय ?
Importance of Modern Technology: शेती ही मूलतः अशीच एक शाश्वत प्रक्रिया आहे . ती नैसर्गिक संसाधने व साधन संपत्तीवर अवलंबून आहे , त्यांचा वापर , विनियोजन आपण शाश्वतपणे करण्याची जरुरी आहे .शाश्वतपणे शेती (Sustainable Farming) करणे म्हणजे काय ?
New Agriculture Technology शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व
आपल्या शेतीद्वारे आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या व पशुधनाच्या अन्नधान्य, चारा व तंतुमय पदार्थाच्या गरजा पूर्णपणे भागवून ती शेती आपल्या पुढील पिढीच्या ताब्यात देणे .
म्हणजेच पुढील पिढीलाही त्यांच्या वाढलेल्या सर्व गरजा योग्य पद्धतीने भागवता येतील .त्यामुळेच शाश्वत शेती करताना त्यातील सर्व प्रणाली ,संसाधने ही जास्तीत जास्त शाश्वत ,पुर्नवापर योग्य असतील ,हे पाहणे आवश्यक आहे .हे करताना वर्तमानातील संपूर्ण कुटुंबाच्या आणि भविष्यातील आपल्या पिढ्यांच्या आर्थिक ,पर्यावरणीय व सामाजिक गरजेइतके उत्पादन शेतीतून मिळाले पाहिजे .New Agriculture Technology शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व
यासाठी केवळ शेतकरीच न्हवे,तर शेतीसंबंधी सर्वाधार्कानी प्रयत्न करून आपली एकंदरीत परिसंस्था (Ecosyastem) सुरळीत चालू राहील , या दिशेने प्रयत्न करावे लागतील .त्यातून केवळ मानवी समुदायाचा न्हवे तर सर्व सजीवांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाची खात्री मिळू शकते .New Agriculture Technology शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व
शाश्वत शेतीचे तत्वे
निसर्गामध्ये फारशी ढवळाढवळ न करता त्यांचे चक्र व्यवस्थितरित्या चालू राहील ,अशी आपली पारंपारिक शेती होती .तीतेंव्हाच्या लोकसंख्येचे उदभरण करण्यास कदाचित पुरेशीही होती . पण ही प्रम्पारिक पद्धती आज जशीच्या तशी वापरता येणार नाही . आजची पर्यावरणीय आर्थिक व सामाजिक आव्हाने पेलत शेती पद्धती जास्तीत जास्त शाश्वत करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे .त्यासाठी शाश्वत शेतीची प्रमुख तत्वे पुढील प्रमाणे राहू शकतात .
संवर्धन शेती (Conservation Agriculture)
हवामान अद्ययावत शेती ( Climate Smart agriculture )
काटेकोर शेती (Precision Agriculture)
वर्तुळाकार व पुनरुतादकशेती (Circular and Regenerative Agriculture )
शेतीचे आर्थिक व्याव्हारीकरण व विविधकरण ( Economic Viability and Diversification )
संवर्धन शेती :
संवर्धन शेती पद्धतीमध्ये अ ) शेत जमिनीच्या मातीची कमीत कमी उलथापालथ ( Minimum Soil Distrurbance ), ब ) कायमस्वरूपी मातीवर आच्छादन (Permanent Soil Cover),क ) वैविध्यपूर्ण पीक परिभ्रमण किवा आळीपाळीने घेणे ( Crop Diversitication and Rotation यांचा अंतर्भाव होतो .या प्रकारच्या पद्धतीमध्ये जमिनीची कमीत कमी किवा शून्य मशागत केली जाते .त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारणे ,धूप कमी होणे व जलसंधारण होणे इ . शाश्वत शेतीसाठी पूरक आणि महत्वाच्या बाबी साधल्या जातात .
हवामान अद्ययावत शेतीद्वारे हवामान बदलांच्या आव्हानाचा सामना करत शाश्वत शेतीला चालना दिली जाते .या शेती पद्धतीमध्ये शेतीची उत्पादकता वाढविण्यासोबतच , हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी शेती पद्धतीची लवचिकता वाढवणे ( Resilience),हवामान बदलाशी शेतीची उतपादाक्ता कमी न होता जुळवून घेणे (Adaption ) आणि हवामान बदलाला कारणीभूत असणाऱ्याहरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करणे (Mitigation ) याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते .New Agriculture Technology शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व
काटेकोर शेती :
या शेती पद्धतीमध्ये विविध संसाधनांचा व निविष्ठांचा वापर काटेकोरपणे केला जातो .म्हणेज च टी संसाधने किवा निविष्ठा शेतीमध्ये ज्या ठिकाणी द्यावयाच्या तिथेच ( at right place),जेवढी आवश्यकता आहे तेवढ्याच प्रमाणात (in right quantity) ,जेंव्हा द्यावयाची गरज आहे तेंव्हाच ( at right time) ,व योग्य पद्धतीने (byright method) दिली जातात . यामुळे संसाधनाचा वापर आणि उपयोग अचूकपणे होतो .त्यातून निविष्ठा अनावश्यक वाया जात नाहीत . त्यातून शेती शाश्वत होण्यास मदत होते .New Agriculture Technology शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व
चक्राकार आणि पुनरुत्पादन शेती :
या पद्धतीमध्ये निविष्ठा ,स्त्रोत किवा संसाधने शेतीकामासाठी वापरली जातात .त्यातून तयार होणारे शिल्लक अवशेष ,टाकाऊ घटक आणि उपपदार्थ (Waste) यातील काही घटक हे आहे तसेच वापरता (Re-use) येतात.यातील काही घटकांवर आवश्यक त्या प्रक्रिया केल्यानंतर वापर (Recycle) करता येतो .किवा त्यातून वेगळ्या घटकांचे निर्माण (Regeneration ) करून त्यांच्या वापर करता येतो .या पद्धतीमध्ये वाया जाणारे घटक कमी प्रमाणात निर्माण होतात .
निविष्ठा व साधन संपत्ती व स्रोतांचा इष्टतम वापर होतो .या पद्धतीने एकच निविष्ठा अथवा स्त्रोत यांचा अनेकवेळा किवा चक्राकार पद्धतीने वापर होत राहतो .त्यामुळे या पद्धती एकंदरीतच शाश्वत शेतीला हातभार लावतात .या प्रक्रियेमुळे शेतीच्या शाश्व्तसोबतच अनेक नैसर्गिक साधन समृद्धी जपली जाते .उदा .माती ,पाण्याचे आरोग्य व गुणवत्ता इ .
शाश्वत शेती करताना वर नमूद केलेल्या एक किवा अनेक तत्वांचा अवलंब करता येतो .यातील कोणत्याही पद्धतीचा अवलंब करताना आपल्याला पारंपारिक तंत्रासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागणार आहे .काही पारंपारिक पद्धतीमध्ये आवश्यकतेनुसार सुधरणा करून घ्याव्या लागतील .शेतीची गरज ,संसाधनाची उपलब्धता ,हवामानात होणारे बदल ,वातावरणाची विविधता असे अनेक घटक लक्षात घेऊन शेतीमधील विविध राबवता येतील .
या प्रक्रियांना आधुनिक तंत्रज्ञानाची उदा . डिजिटल तंत्रज्ञान जोड दिल्यास त्या अधिक प्रभावी ठरू शकतील डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण शेती प्रणालीचे आकलन वर्तमान परिस्थितीप्रमाणे करता येते .त्याप्रमाणे शेतीमध्ये विविध कामे करता येतील . डिजिटल तंत्रज्ञानामध्ये सुदूर संवेदन (Remote Sensing-RS),भौगोलिक माहिती प्रणाली ( Geographical information System-GIS),वैश्विक स्थान निश्चितीकरण प्रणाली (Global Positioning System-GPS),स्वायत्तपणे मानव विरहीत उडणारे हवेतील वाहन (Drone-UAV),कृत्रिम बुद्धिमता (Artificial Intelligence-AI),यंत्रमानव (Robotics),संवेदके(Sensors),संगणकीय प्रणाली (Computer System),निर्णय समर्थन प्रणाली (Decision Support System-DSS),इंटरनेट ऑफ थिंग्स (Internet of Things) इत्यादीचा अंतर्भाव होतो .