शेतकर्यांसाठी नवीन योजना सुरु झालेली आहे Magel Tyala Saur Krushi Pump मागेल त्याला सौर कृषि पंप योजना . आता शेतकर्यांना त्यांच्या शेतात सौर कृषि पंप बसवता येणार आहे त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहे.तर या योजनेची माहिती आपण बघूया .

मागेल त्याला सौर कृषि पंप योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे पाण्याचे विश्वसनीय स्त्रोत्र आहेत परंतु सिंचनासाठी वीज उपलब्धनाही . या योजने अंतर्गत या शेतकर्यांनी सिंचनासाठी मदत करण्यासाठी सोलर पंप बसवण्यात येणार आहेत .Magel Tyala Saur Krushi Pump मागेल त्याला सौर कृषि पंप योजना
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- शेतकऱ्यांना सिंचनाचा अधिकार मिळावा याची खात्री देणारी स्वयंपूर्ण योजना.
- फक्त 10 % खर्च देऊन शेतकरी सौर पॅनेल चा संपूर्ण संच आणि कृषि पंप मिळवू शकतात.
- SC/ST शेतकर्यांसाठी ,त्यांना फक्त 5 % भरावे लागतील .
- उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकार करतात.
- जमिनीच्या आकार नुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचे पंप दिले जातील.
- विम्यासह पाच वर्षाच्या दुरुस्तीची हमी समाविष्ट आहे .
- वीज बिल किवा वीज कपातीची काळजी करण्याची गरज नाही .
- सिचन वापरासाठी दिवसा वीज हमी दिली जाते.
लाभार्थी निवडीचे निकष
- 2.5 एकर पर्यंत जमीन असलेल्या शेतकर्यांना 3 हॉर्स पॉवर (HP ) पर्यंतचे सौर पंप मिळतील . 2.51 ते 5 एकर जमीन असलेल्या शेतकर्यांना 5 एचपी पंप मिळणार आहेत. 5 एकरपेक्षा जास्त असलेल्या शेतकर्यांना 7.5 HP पंप मिळणार आहेत.( शेतकरी त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी उर्जा असलेल्या पंप देखील निवडू शकतात.)
- वैयक्तिक किवा सामुदायिक शेत तळे,विहीर , बोअरवेल आणि नद्या किवा नाल्याजवळील मालकही या योजनेसाठी अर्ज करू शकतात .
- विहीर , बोअरवेल किवा नद्या असलेल्या शेतकऱ्यांकडे त्यांच्या जागेवर पाण्याचा विश्वसनीय स्त्रोत असणे आवश्यक आहे .(तथापि , संवर्धनासाठी असलेल्या जालाशायामधून पाणी घेण्यासाठी पंप वापरता येत नाहीत .)
- ज्या शेतकर्यांनी पूर्वीच्या सौर पंप योजनाचा लाभ घेतला नाही (जसे कि अटल सौर पंप योजना 1 आणि 2 आणि मुख्यमंत्री सौर पंप योजना ) ते अजूनही या मोहिमेसाठी अर्ज करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्यांकडे असलेल्या शेतीचा 7/12 उतारा (जल स्त्रोत्रची नोंद आवश्यक आहे . ) अर्जदार स्वतः शेत जमिनीचा एकटा मालक नसेल , तर इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला रु २००/- च्या स्टॅम्प पेपर वर देणे बंधनकारकआहे .
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- जातीचा प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / जमाती लाभार्थीसाठी )
- पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असलेल्या भूजल सर्वेक्षण विभाग तर्फे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
Note- कागदपत्रे pdf फाईल मध्ये करावीत ज्याची साईज 500 KB पेक्षा जास्त नसावीत.
ऑनलाइन अर्ज करण्यची प्रक्रिया
मागेल त्याला सौर कृषि पंप योजनाला अर्ज करण्यसाठी अधिकृत Solar MTSKPY पोर्टल वर जा त्यानंतर लाभार्थी सुविधा या टॅब वर क्लिक करून अर्ज करा या बटनावर क्लिक करा.Magel Tyala Saur Krushi Pump मागेल त्याला सौर कृषि पंप योजना

अर्जामध्ये तुम्हाला वैयक्तिक आणि जमिनीची माहिती , रहिवासी पत्ता , जलस्रोत / सिचन माहिती , कृषि तपशील , अगोदर असलेल्या पंपाचा तपशील , लागणाऱ्या पंपाचा तपशील , बँक तपशील , घोषणापत्र आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज Submit करा.

अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला पोच पावती मिळेल ज्याचा वापर करून तुम्ही अर्जाची स्तिथी पाही शकता आणि रक्कम भरणा करू शकता.Magel Tyala Saur Krushi Pump मागेल त्याला सौर कृषि पंप योजना

हेल्पलाइन नंबर
एखाद्या शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करताना अडचण आल्यास त्यांनी तालुकास्तरावरील महावितरण उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा . ते महावितरणच्या केंद्रीय ग्राहक सेवा केंद्राशीही संपर्क साधी शकतात . मदतीसाठी शेतकरी १८००-१३३-३४३५ किवा १८००-२१२-३४३५ या टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतात. Magel Tyala Saur Krushi Pump मागेल त्याला सौर कृषि पंप योजना