
मृग बहरामध्ये सीताफळासाठी ही योजना अनुसूचित जिल्हा आणि अधिसूचित तालुका, अधिसूचित महसुल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेद प्रकल्प अंतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. सिताफळ पिकास खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस (आर्थिक) खालील प्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. सिताफळ बाग तीन वर्ष पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.Custard apple|सीताफळासाठी विमा योजना 2025
Custard apple|सीताफळासाठी विमा योजना 2025
- विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर: 70,000 रुपये
- भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक:31 जुलै 2025
- शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता: 3,500 रुपये प्रति हेक्टर
- या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचे अॅग्री स्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे
- या योजनेत सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
- बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किवा ऑनलाइन फळपिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी अॅग्री स्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा 7/12,8 (अ) उतारा व पिक लागवड स्वयं घोषणापत्र, फळबागेचा जिओ टॅगीग केलेला फोटो,बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाईन भरता येतील.Custard apple|सीताफळासाठी विमा योजना 2025
विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी
जिल्हा | विमा कंपनी |
जळगाव,नांदेड | भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड |
जालना | फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी.लि. |
छत्रपती संभाजीनगर,धाराशिव ,अमरावती,परभणी | युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कं.लि |
धुळे,पुणे,सांगली,लातूर,बुलढाणा,नाशिक,अहिल्यानगर,सोलापूर,सातारा,बीड,वाशीम | बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्स कंपनी.लिमिटेड |
हवामान धोके व कालावधी प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम (प्रति/हेक्टर)
- पावसाचा खंड: 1ऑगस्टते ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये सलग 15 दिवसांचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 12,000 रुपये देय होईल. या कालावधीमध्ये सलग 20 दिवसांचा पावसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 21,000 रुपये देय होईल.या कालावधी मध्ये सलग 25 किवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा पाऊसाचा खंड राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 42,000 रुपये देय होईल.
- जास्त पाऊस: 1ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 1दिवस 40 मी.मी पाऊस झाल्यास रक्कम 11,200 रुपये नुकसान भरपाई देय होईल. या कालावधीमध्ये सलग 2 दिवस प्रति दिन 40 मी.मी पाऊस झाल्यास रक्कम 28, 000 रुपये नुकसान भरपाई देय होईल.( कमाल नुकसान भरपाई रक्कम 28,000 रुपये)
- या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांनी फळपिक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपिक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, आकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्याचे विरोधात कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्याकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.Custard apple|सीताफळासाठी विमा योजना 2025
- शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा.
- शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. ई-पीक पाहणी आणि विमा घेतलेली पिक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केंव्हाही रद्द होऊ शकतो. एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसुचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
- या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागासाठी एका फळपिका खालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे आणि उर्वरित विभाग करिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे अशी मर्यादा राहील. जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी 4 हेक्टर मर्यादे पर्यंत राहील.
- विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असावे.Custard apple|सीताफळासाठी विमा योजना 2025
- शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in शेतकऱ्यांनी उत्पादन योग्य फळपिक नसताना विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्याकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे,त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
- अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.Custard apple|सीताफळासाठी विमा योजना 2025