Papaya Farming|खानदेशात पपईची चांगली वाढ

papaya crop: पपईची लागवड खानदेशात स्थिर आहे. नंदुरबार जिल्हा पपई लागवडीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे ५२०० हेक्टरवर पपई पीक होते.

Papaya Farming|खानदेशात पपईची चांगली वाढ

Papaya Farming|खानदेशात पपईची चांगली वाढ

उष्णतेचा फटका बसलेले पपई पीक पावसानंतर बऱ्यापैकी सुधारले आहे. पिकाची वाढ चांगली झाली आहे. आगाप लागवडीच्या पिकात फुलधारणा सुरु आहे.पपईची लागवड खानदेशात स्थिर आहे. नंदुरबार जिल्हा पपई लागवडीत आघाडीवर आहे.जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे 5200 हेक्टरवर पपई पीक होते.

नंदुरबारातील एकट्या शहादा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपई पिकाची लागवड झाली होती. परंतु मागील हंगामात पपईला अल्प दर मिळाला. फक्त ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२३ च्या माध्यमापर्यंत दर टिकून होते .सुरुवातीला पपई दर 30 रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. जशी आवक वाढली तसे पपई दर कोसळले.डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत पपईला सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.

मार्चमध्ये दुसऱ्या आठवड्यात पपई दरात सुधारणा झाली. परंतु मार्च महिन्यापर्यंत अनेकांनी पीक काढून क्षेत्र रिकामे केले. कारण काढणी ठप्प होती.खरेदीदार पपई घेण्यास येत नव्हते. शेतातच किंवा झाडावर पपई पक्व होऊन खराब होण्याचा प्रकारे वाढला होता. शिवाय नंदुरबार, धुळे जिल्ह्यात रोगराईमुळे पपई पिकाची हानी झाली.

त्यामुळे पपई लागवड 2024 मध्ये घटेल,असे संकेत होते. पपईची लागवड खानदेशात मार्च ते मे या कालावधीचा केली जाते.परंतु अनेकांनी अधिक कालावधीच्या रोगप्रतिकारक्षम पपई वाणाची लागवड केली.ही लागवड जानेवारी व फेब्रुवारीत झाली. नंदुरबार जिल्ह्यात मात्र लागवड घटली आहे.Papaya Farming|खानदेशात पपईची चांगली वाढ

जिल्ह्यातील लागवड 25 टक्के कमी झाली आहे. परंतु जळगाव जिल्ह्या तील लागवड 30 टक्कयांनी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर व अन्य भागात पपई पिक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे 16५० हेक्टरवर पपई पीक आहे. धुळ्यातही सुमारे १२०० हेक्टरवर पपई पीक आहे.तर नंदुरबारातील लागवड ३५०० हेक्टर पर्यंत आहे.

आगाप पिकाला यंदा अति उष्णतेचा मोठा फटका बसला आहे. मे च्या अखेरीस व जूनच्या सुरुवातीला उष्णता अधिक होती. कमाल तापमान 47 अंश सेल्सिअस काही भागात होते. याचा फटका एप्रिल व मे मध्ये लागवड केलेल्या व आगाप पिकाला बसला आहे.Papaya Farming|खानदेशात पपईची चांगली वाढ

काही शेतकऱ्यांचे पपई पिक काढून फेकावे लागले आहे. पिकाचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर व अन्य उपाययोजना केल्या. त्यासाठी खर्च अधिक लागला. परंतु उष्णतेमुळे उत्पादकतेला फटका बसणार असून, काही बागांचा काढणी हंगामही लांबणार आहे, अशी माहिती मिळाली.Papaya Farming|खानदेशात पपईची चांगली वाढ