sugarcane|नियोजन साखर उतारा वाढविण्याचे २०२५

भारतातील साखर उतारा आणि त्यांचा एकूण कल हा वेगळ्या हंगामानुसार आणि प्रत्येक तोडणी हंगामामध्ये कमी जास्त होत असतो. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीनुसार बहुतेक साखर कारखान्यांची साखर उताऱ्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीत कमी होत असल्याची दिसत आहे. संतुलित साखर उतारा स्तर हा नफ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढत्या लोकसंख्येच्या व दरवाढीनुसार तसेच राष्ट्रीय परी पेक्षातून प्रती हेक्टर उत्पादन वाढव संतुलित उतारा राखणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच दरडोई साखरेची गरज भागवणे आणि इथनोल मिश्रण धोरणांच्या पूर्ततेसाठी गरजेचे आहे.

sugarcane|नियोजन साखर उतारा वाढविण्याचे २०२५

भाग -1

सद्य: स्थितीतील साखर तारा कल

भारताचे ऊसा खालील क्षेत्र 59 लाख हेक्टर व महाराष्ट्रात 14. 88 लाख हेक्टर एवढे होते. त्यातून 3212. 01 लाख व महाराष्ट्रात 1093. 91 लाख टन एवढी गाळप होऊन सरासरी 9. 95% एवढा साखर उतारा मिळाला .यातून 329. 71 लाख टन व महाराष्ट्रात 105. 44 लाख टन एवढी साखरेचे उत्पादन झाले. देशाचा सरासरी उतारा हा 2022 -23 मध्ये 9. 95% एवढा होता 2023 – 24 साखर उताऱ्यात घसरून होऊन तो 9. 95% एवढा झाला.. त्या तुलनेत 2018-19 मध्ये 11. 10% असल्याचे दिसून आले आहे .

असमान व कमी साखर उताऱ्याची कारणे

साखर उतारा हा कारखान्यांची कार्यक्षमता उसाच्या प्रतीवर अवलंबून असते. साखर कारखाना अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी व साखर उतारातील चढ-उतार नियंत्रण ठेऊन जास्तीत जास्त लक्ष हे उत्पादन वाढीवर व दर्जेदार ऊस पुरवठ्याकडे द्यावे लागल, तरच साखर उतारा गाठता येईल.

गाळलं हंगामाच्या सुरुवातीस कमी साखर उतारा येण्याची कारणे

तोडणीपूर्व प्रतिकूल हवामान परिस्थिती

  • देशातील बऱ्यापैकी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होतो. त्या अगोदर परतीचा मान्सून उत्तर-पूर्व संपल्यानंतर पाठीमागील महिन्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आद्र्ता असते.
  • या महिन्यांमधील रात्रीचे कमाल तापमान जास्त असल्यामुळे साखर कांड्यामध्ये साखर भरण्यास पोषक परिस्थती नसते . ही परिस्थिती उसाच्या वाढीसाठी पोषक असते. काही भागांमध्ये तुरा आलेला व नुकताच पोंग्यातून तुरा बाहेर पडलेल्या उसाची पक्वता व उच्चतम साखर उतारा येण्यास महिना ते दोन महिन्याचा कालावधी लागतो.
  • तटबंधीय प्रदेशात मान्सूनच्या अनिश्चितेमुळे उस पिकावर परिणाम होतो. काही भागांमध्ये गाळप हंगाम मान्सूनच्या परतीनंतर लगेच सुरू होतो.काही प्रदेंशात मे,जून महिन्यानंतर लगेच सुरु होतो.

कमी वयाचा (अपक्व ) उस

  • कमी वयाचा उस व तोडनिपुर्वीची प्रतिकूल हवामान परिस्थिती या दोन संयुक्त समस्या दिसून येतात. ज्या कारखान्याच्या गाळप हंगाम जवळपास सहा महिन्यापर्यंत आहे, ऊस लागण हंगाम हा फक्त दोन ते तीन महिन्यांमध्ये केंद्रित झाला आहे, अशा कारखान्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होते.उदा. तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये ऊस लागण होते. गाळप हंगाम हा नोव्हेंबर पासून सुरू होईन एप्रिल, मे पर्यंत चालतो.
  • दक्षिण कर्नाटक मध्ये लागण हंगाम हा जुलै, ऑगस्ट दरम्यान असतो.गाळप हंगाम हा जून ते फेब्रुवारी असा असतो. समशीतोष्ण प्रदेशात म्हणजेच उत्तर भारतात प्रामुख्याने मार्च, एप्रिल दरम्यान लागण होते . नोव्हेंबर पासून गाळप हंगाम सुरू होतो. त्यामुळे कमी वयाचा,अपक्व उस सुरुवातीच्या वेळी गाळपास उपलब्ध होतो. अशा प्रकारची केंद्रित लागण ही काही कारणमुळे होत असते. त्यामध्ये जमीन दुसऱ्या पिकाखाली असणे, प्रतिकूल जमीन हवामान लवकरची केंद्रित लागण, सिंचनाची उपलब्धता व इतर समस्या असतात. जे कारखाने संपूर्ण गाळप हंगामासाठी एक किंवा दोन वाणावरती पूर्णतः अवलंबून आहेत, त्या ठिकाणी ही समस्या फार गंभीर होते.

उसाखालील क्षेत्र ,गाळप,उत्पादन आणि सरासरी उतारा

वर्ष उसाखालील क्षेत्र (लाख हेक्टर)गाळप (लाख टन )साखर उत्पादन (लाख टन )उतारा (टक्के )
भारत महाराष्ट्र भारत महाराष्ट्र भारत महाराष्ट्र भारत महाराष्ट्र
2013 -14 49.939.372381.76664.34
243.6076.8510.2313.44
2014-15 50.6710.302731.73931.16283.13105.0710.3713.41
2015-1649.279.872364.98743.86251.2584.2410.6213.30
2016-17 44.366.331934.34373.13202.6242.0010.4813.16
2017-18 47.329.023011.98953.56323.28107.2410.7313.25
2018-19 51.1411.633011.79952.11331.63107.2011.1013.31
2019-20 48.418.222512.94550.64271.1163.1410.7911.49
2020-2152.8811.423005.851014.59311.20106.3710.3511.17
2021-22 54.5514.883547.001322.31359.55137.2010.1411.29
2022-2359.0014.883212.011053.91329.71105.4409.9511.28
2023-2459.8114.983129.751076.18340.00119.0810.0910.07

शिफारशीत नसलेल्या जातींची निवड

  • बऱ्याच उस जाती चांगल्या पक्वतेसाठी हवामान शास्त्रीय विविध मापदंडावर अवलंबून असतात (तापमान सूर्यप्रकाश व आद्रता इत्यादी). जाती मोठ्या प्रमाणात तापमानावर अवलंबून असतात. हवामानाचे विविध घटक हंगाम लवकर सुरू करून चांगला साखर उतारा मिळण्यास अनुकूलन नसतात, त्यामुळे ज्या जाती प्रामुख्याने तापमान, इतर हवामान घटकांवर मुख्यतः अवलंबून असतात, त्यातून कमी प्रतिचा उस तयार होतो.
  • तापमान असंवेदनशील उस जातीच्या पक्वतेसाठी आपल्याकडे फारसे प्रमाण बुद्ध संशोधन झाले नाही.तापमान संवेदनशील जातीमध्ये प्राथमिक सक्षम असणाऱ्या ऊस जाती तापमान नियंत्रण कक्षेमध्ये चांगल्या प्रकारची साखर वाढवू शकतात. साखर साठवण्यासाठी जाती प्रतिकूल असू शकतात .
  • काही अंशांमध्ये चांगली साखर असणाऱ्या कमी कालावधीच्या व लवकर पक्वतेच्या जाती या तापमान असंवेदनशील असल्याचे दिसून आले आहे. अशा जातीच्या सुरवातीच्या कालावधीमध्ये लागवड केल्यास साखर उतारा वाढविण्यास मदत होते.

अशास्त्रीय ऊस तोडणी

  • सद्य: स्थितीत ऊस पुरवठ्याची रचना ही वेगवेगळ्या निकषांवर अवलंबून आहे.ऊस लागण तारखेच्या जेष्ठतेनुसार बरेच कारखाने चालू लागला आणि खोडव्याचा तोडणीचा उपक्रम ठरवितात. ही व्यवस्था एकाच वेळीच्या केंद्रित लागणी मुळे किंवा एकाच वेळी खोडवा राखल्यामुळे उपयशी ठरते.
  • कोणत्याही ठराविक वेळेत कमाल साखर उतारा हे ध्येय असल्यास गाळप हंगामाचे काटेकोर नियोजन करावे लागेल. त्यासाठी ऊस तोडणीचे शास्त्रीय नियोजन (हंगाम व जातीनिहाय )करून चांगल्या दर्जाचा उस दररोजच्या गाळपास येईल हे पाहायला हवे.
  • काही परिस्थितीत खोडव्याची तोड सुरुवातीस केली जाते. खोडवा लवकर पक्व होतो अशी धारण आहे. आपल्याला बऱ्याच जातीमध्ये 11 महिने वयाच्या उसापेक्षा 12 महिन्याच्या खोडवा उसामध्ये दर्जा व गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे.