
ड्रगन फ्रुट वरील स्टेम कॅन्कर रोगाची ओळख आणि व्यवस्थापन
पौष्टिक,औषधी गुणधर्म आणि बऱ्यापैकीचांगला दर मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात ड्रगन फ्रूटची लागवड वाढत चालली आहे .वाढत्या लागवडी सोबत या पिकामध्ये बुरशीजन्य ,जीवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावहीवाढत आहे .रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ४० ते 80 टक्क्यापर्यंत घट होऊ शकते .या लेखामध्ये स्टेम कॅन्कर या रोगाची ओळख आणि व्यवस्थापनाची माहिती घेऊ .
ड्रगन फ्रुट पहिल्यांदा भारतात १९९० च्या दशकात आले.भारत सरकारने त्यास ‘कमलम’ हे नाव दिले आहे.महाराष्ट्रातील सांगली,सोलापूर,अहिल्यानगर,सातारा,पुणे,नाशिक यांसह मराठवाडा,विदर्भा तील काही फळझाड कॅकट्सवर्गीय आणि काटक असेल तरी अन्य फळपिकांप्रमाणे त्यामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो.ड्रगन फ्रुट वर फळे आणि फुलांवर विविध बुरशीजन्य ,जीवाणूजन्य रोग आढळून येतात.अलीकडे ड्रगन फ्रुट वर स्टेम कॅन्कर या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत असल्याने निदर्शनास आले आहे .या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ४० ते 80 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते .
रोगाची ओळख
रोगाचे इंग्रजी नाव : स्टेम कॅन्कर
रोगाचे मराठी नाव : खैऱ्या
रोगाचा प्रकार : बुरशीजन्य
बुरशीचे नाव : Neoscytalidium dimidiatum
रोगाची लक्षणे
ड्रगन फ्रुट वरील स्टेम कॅन्कर (खैऱ्या ) या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची सुरुवात फांदीच्या ( क्लॅडोडस ) किवा फळाच्या पृष्टभागावर होते .त्यानंतर त्या बुरशीचा पृष्ठभागावरील पेशीमध्ये थेट प्रवेश होतो .सुरवातीस फांदी (क्लॅडोडस) किवा फळावर लहान आकाराचे पिवळसर,केशरी ते तपकिरी ठपके दिसून येतात .या ठिपक्यांच्या मध्यभागी लहान केशरी रंग असतो.तो कालांतराने मोठ्या,बहिवर्क,केशरी ते लालसर-तपकिरी डागामध्ये बदलत गोलाकार बनतो .या ठिपक्यांच्या बाहेरील कडा कधीकधी पिवळ्या रंगाने वेढलेला असतात .त्यानंतर बुरशीच्या लहान काळ्या पिकनिडीया तयार होतात .त्याचे रुपांतर फिकट पिवळ्या राखाडी मृत उतीमध्ये होते .पुढे ते अधिक कोरडे होतात.फांदीला (क्लॅडोडला) छिद्र पडते .यालाच ‘शॉट-होल ‘ म्हणून ओळखले जाते .अशा रोगग्रस्त फांद्यापासून पुढे मोठ्या प्रमाणात बीजाणू (कोनीडिया) पसरतात.त्यामुळे रोगाच्या दुय्यम प्रसार होतो.ड्रगन फ्रुट वरील स्टेम कॅन्कर रोगाची ओळख आणि व्यवस्थापन
यजमान पिके
ही बुरशी विस्तृत प्रादुर्भावाची क्षमता प्रदर्शित करते.तिचा सुमारे १२६ विभिन्न वनस्पतीवर प्रादुर्भाव होत असल्याचे आढळले आहे.उदा.आंबा ,ओक ,बदाम,टोमॅटो इ .
नुकसान
आम्ही पश्चिम महाराष्ट्रा मध्ये विविध ठकाणी केलेल्या सर्वेक्षणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सरासरी ६१.२३ टक्के आढळून आला.रोगाची तीव्रता सरासरी ३३.६४ टक्के दिसून आली .80 टक्क्यापेक्षा अधिक तीव्रतेचा कॅन्कर दर्शविणारी झाडे पुनर्जीवित होणे शक्य नसते .कारण कॅन्करमध्ये विकसित होणाऱ्या डागांमुळे स्टेम कुजतच जातात.या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळेही कुजतात.अशा फळांचा गर खाण्यायोग्य राहत नाही.पर्यायाने असे फळ विक्रीसाठी अयोग्य मानले जाते.या रोगामुळे फळ उत्पादनात ४० ते 80 टक्क्यापर्यंत कमी होते.सर्वात महत्वाचे म्हणजे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाचे आयुष्य कमी होते.
पोषक वातावरण
या रोगास कारणीभूत असणारी बुरशीची प्रजाती ही उच्च-तापमानात तग धरून राहणारी आहे.रोग चक्र आणि बुरशीच्या अस्तितवासाठी पाण्याची कमतरता,दुष्काळ आणि ३५ अंश सेल्सियस पेक्षा अधिक तापमान हे अनुकुल असेत.अशा विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीत हा रोग अत्यंत विनाशकारी ठरू शकते.स्टेम कॅन्करचा तीव्र प्रादुर्भाव सहसा उन्हाळ्यात होतो.कारण त्याच वेळी जास्त तापमानासोबतच पाण्याच्या तानालाही पिकांना सामोरे जावे लागते.हवामान बदलामुळे या रोगाचा धोका वेगाने वाढत आहे. ड्रगन फ्रुटचा वान ,झाडाचे वय,वर्षाचा हंगाम,जैविक आणि अजैविक ताण यांसारख्या घटकांवर रोगाच्या लक्षणाची तीव्रता आणि विविधता अवलंबून असते.ड्रगन फ्रुट वरील स्टेम कॅन्कर रोगाची ओळख आणि व्यवस्थापन
प्रसार
स्टेम कॅन्करची बुरशी जखमा आणि नैसर्गिक छिद्रांसह विविध माध्यमां द्वारे संक्रमित करू शकते. विशेषता:ड्रॅगन फळांमध्ये ॲप्प्रेसोरियाच्या निर्मितीद्वारे थेट प्रवेश करते स्टेम कॅन्करचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाणे लागवडीसाठी वापरली जाणारी रोगग्रस्त बेणे,(क्लाडोद्स ) माती, वारा ,पाऊस आणि विविध कीटकांमुळे होऊ शकतो
एकात्मिक व्यवस्थापन
- शिफारशीत अंतरावरच ड्रॅगन फ्रुट ची लागवड करावी.
- लागवडीसाठी रोग विरहित बेणे वापरावे .
- लागवड करण्यापूर्वी क्लॅडोत्रस वर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी .
- कॅन्कर रोगाच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी बागेची स्वच्छता ही मूलभूत तत्व आहे.
- फळ काढणी हंगामानंतर बागेची छाटणी करून रोगग्रस्त फांद्या (क्लाडोद्स ) काढून बिजाणूंची स्त्रोत नष्ट करावेत .
संशोधनातील निष्कर्ष
या रोगासाठी लेबल क्लेम किंवा अॅग्रेस्को शिफारस सध्या उपलब्ध नसल्याचे आढळते.तथापि, संशोधकांच्या आचार्य पदवी संशोधनात पुढील बुरशीनाशके उपयुक्त आढळले आहेत.मात्र त्यांना अधिकृत शिफारस म्हणता येणार नाही.
प्रतिबंधात्मक फवारणी प्रति लिटर पाणी
- कार्बेंन्डाझीम (12टक्के ) अधिक मॅंन्कोझेब ( 63 टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) 2 ग्रॅम किंवा
- टेब्यूकोनॅझोल( 50 टक्के ) अधिक ट्रायफ्लोक्सिस्ट्रोबीन ( 25टक्के डब्ल्यूजी) ( संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम.
टीप
- मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीटकनाशकांचा वापर टाळावा.
- पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीटकनाशकांचा समंजस वापर करावा.