महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना सल्ला : वाफसा येण्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागणार

राज्यात मान्सूनच्या पावसाने नेहमीपेक्षा 15 दिवस अगोदरच हजेरी लावली असून ,झालेल्या जोरदार पावसामुळे जमिनीला वाफसा येण्यास आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे .त्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामात पीक घेण्यासाठी जमिनीची पूर्वमशागत नागरणी करावी ,असा सल्ला राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे .खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणांचे नियोजन करावे .खरीप पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा
खरीप पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा
विद्यापीठाकडून हवामान आधारित कृषि सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो .शेतकऱ्यांनी खरीपात कडधान्याचे पीक घेण्यासाठी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात व शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी पाच टन कंपोस्ट किवा शेणखत शेतात मिसळावे ,असेही कळविण्यात आले आहे .खरीप पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा
मागील काही दिवसांपासून सर्वदूर पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे .जवळपास सर्व विभागांमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा अंदाज आहे .यापूर्वी मान्सूनचे आगमन 1 जून रोजी केरळ मध्ये होत असे आणि ७ जून ते १० जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात व्यापात असे .या वर्षी मान्सूनचे आगमन हे केरळ मध्ये २४ मे तर महाराष्ट्रात दमदार २५ मे ला झालेला आहे .पुढील 4 ते पाच दिवस महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे .त्यामुळे किमान वाफसा येण्यास ७ ते 8 दिवस लागण्याची शक्यता असल्याने शेतकरी बंधूनी पेरणीची घाई करू नये ,असेही विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे .
खरीप हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांनी शेतामध्ये पावसाचे पाणी साठून राहणार नाही यासाठी व अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतातून पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी .वाफसा आल्यानंतर कुळवा ने मशागत करावी म्हणेज उगवलेल्या तणांचा बंदोबस्त होईल व शेत पेरणीयोग्य होईल .हवेतील उष्णता मृग नक्षत्राच्या आसपास कमी होऊन जमिनीतील किडीचा मुख्य पिकांवर प्रादुर्भाव होणर नाही व ताणाचाही प्रादुर्भाव कमी होईल .खरीप पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणे वापरा
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सल्ले
- हलक्या जमिनीत वाफसा आल्यानंतर कुळवाने पूर्वमशागत करा .
- बियाण्यांस फुले सुपर बायोमिक्स ची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा .
- पेरणीयोग्य 100 मी.मी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे .अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर पेरणी करा .
- खरीपातील पिकांच्या पेरणीसाठी दर्जेदार व प्रमाणित बियाणांचे नियोजन करा .
- भात रोपवाटिका तयार करण्याचे नियोजन करावे .
- हलक्या जमिनीत हुलगा ,मटकी पेरणीस प्राधान्य द्यावे .
- मध्यम व भारी जमिनीत उडीद ,मुग ,चवळी ,सुर्यफुल ,तूर पेरावी .
- आंतरपीक पद्धतीचा वापर करावा .त्यामध्ये कोरडवाहू विभागामध्ये तूर +सुर्यफुल (2:1 ),तूर + बाजरी (2:1 ), तूर +मुग /उडीद (2:1) आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरू शकेल .
- हुमणी अळीच्या भुंग्याचे नियंत्रण करावे : हुमणी अळीच्या भुंग्याचा वावर हा प्रमुख्याने संध्याकाळी 6 ते ७ वाजेदरम्यान असतो .त्याकरिता एकरी एक प्रकाश सापळा संध्याकाळी 6 ते ७ वाजेच्या दरम्यान लावला .