शेळीपालन ,मेंढीपालन महामेष योजना 2025

शेळीपालन ,मेंढीपालन महामेष योजना 2025

महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील पशुपालक आणि धनगर समाजातील नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना सुरू केली आहे. ही योजना मेंढीपालन व्यवसायाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. 2017 पासून सुरू झालेल्या या योजनेत राज्यातील विविध जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत व प्रगत मेंढीपालनासाठी 75 % पर्यंत अनुदान दिले जात आहे.

महाराष्ट्रात 1 लाखांपेक्षा अधिक लोकांकडून मेंढीपालन व्यवसाय केला जातो. राज्यातील मेंढ्यांच्या संख्येत घट होत आहे तसेच धनगर समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली जाते आहे.या योजनेचा मुख्य उद्देश मेंढीपालन व्यवसायाच्या माध्यमातून भटक्या जमातींना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने नेणे हा आहे. सध्याच्या काळात मेंढीपालन व्यवसाय कमी होत चालला आहे. त्यामुळे या योजनेद्वारे मेंढीपालनाला प्रोत्साहन देऊन पशुपालकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे अपेक्षित आहे

शेळीपालन,मेंढीपालन योजनेची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे शेळीपालन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. त्यामुळे अर्जदार आपल्या घरी बसूनही मोबाईलच्या माध्यमातून या योजनेसाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • अर्जदाराने अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची सर्व माहिती वेळोवेळी त्याला प्राप्त होईल. त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खाते मध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा होईल.

शेळीपालन, मेंढीपालन योजना अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य

  • राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पशुपालन प्रशिक्षण घेतले आहे.
  • अशा नागरिकांना शेळीपालन अनुदान योजने मध्ये प्राधान्य दिले जाईल.
  • राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासही या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येत आहे.
  • अल्प व अत्यल्प भूधारक एक हेक्टर पर्यंतचे शेतकरी यांनाही या योजनेत प्राधान्य दिल्या जात आहे.
  • अल्पभूधारक एक ते दोन हेक्टर पर्यंत शेतकरी यांनाही या योजनेमध्ये प्राधान्य दिले आहे.
  • याबरोबरच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदणी केलेले) अशा तरुणांना ही या योजनेतून लाभ दिला जातो.
  • तसेच राज्यातील महिला बचत गटातील लाभार्थ्यालाही या योजनेत प्राधान्य दिले जाते

पात्रता:

महामेष योजनेसाठी 18 ते 60 वर्षे वयोगटातील महाराष्ट्राचे नागरिक अर्ज करू शकतात.
फक्त भटक्या जाती व जमातीतील नागरिकांसाठी ही योजना खुली आहे.
योजनेत लाभांचे वाटप महिलांसाठी 30% आरक्षण आहे, तसेच अपंगांसाठी 3% आरक्षण आहे. यामुळे महिलांच्या नावावर अर्ज केल्यास अर्ज मंजूर होण्याची शक्यता अधिक आहे.

नियम व अटी :

  • केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच शेळी पालन योजनेचा लाभ घेता येईल.
  • राज्य बाहेरील नागरिकांनी अर्ज केल्यास तो रद्द केला जाईल.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही शेळीपालन योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • ज्या व्यक्तीला पशुपालन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्याच्याकडे स्वतःच्या मालकीची किमान 9000 वर्ग मीटर जमीन असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये 100 शेळ्या व पाच मेंढ्या राहू शकते.
  • या योजनेसाठी 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • पशुपालकाकडे शेळ्या, मेंढ्याचे देखभाल व त्याच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी सुविधा असाव्यात.
  • शेळ्या, मेंढ्यासाठी लागणारा चारा उगवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला शेळी किंवा मेंढी पालनाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते.
  • अर्जदार अनुसूचित जाती, जमातीचा असल्यास त्याला अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे बंधनकारक आहे.
  • अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सिलिंग असणे ही गरजेचे आहे.
  • अर्जदाराला अर्जासोबत राशन कार्ड वर जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांची नावे व त्यांचा आधार नंबर इत्यादी संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
  • या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला मिळू शकतो.

अर्ज कसा करावा?

योजनेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जदारांना Mahamesh योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावा लागेल. अर्जासाठी आधार क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रांची अपलोड करणे अनिवार्य आहे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे click करा

शेळीपालन, मेंढीपालन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • जमिनीचा सातबारा व 8 अ
  • पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • बँक खात्याची माहिती
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अर्जदार दिवंगत असेल तर त्या संदर्भाचे प्रमाणपत्र
  • हमीपत्र

शेळीपालन,मेंढीपालन योजनेसाठीची अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

  • सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारच्या शेळी पालन योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला सरकारच्या अधिकृत https://ahd.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल यावर शेळी मेंढी पालन योजना अर्ज या पर्यायावर क्लिक करा
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा संपूर्ण अर्ज उघडेल
  • या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा
  • तसेच या अर्जासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज एकदा संपूर्ण तपासून घ्या
  • अर्ज बरोबर असेल तर तुम्ही तुमच्या समोर असलेल्या सबमिट बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करू शकता
  • अशाप्रकारे तुम्ही शेळीपालन योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता

शेळीपालन,मेंढीपालन योजनेसाठीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • महाराष्ट्र सरकारच्या शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जावे लागेल
  • पशुसंवर्धन विभागात गेल्यानंतर कृषी विभागातून शेळी पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल
  • त्यानंतर अर्ज विचारली संपूर्ण माहिती भरून देत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडावी लागतील
  • त्यानंतर अर्ज पशुसंवर्धन विभागात जमा करावा लागेल
  • अशा प्रकारे तुमची शेळीपालन योजनेच्या माध्यमातून ऑफलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल

महामेष योजनेतून मिळणारे फायदे

  • योजनेत 20 मेंढ्या आणि 1 नर मेंढा वाटप केले जाते. यासाठी 75% अनुदान उपलब्ध आहे.
  • मेंढ्यांच्या चराईसाठी 6000 रुपये प्रतिमाह, अशा चार महिन्यांसाठी 24,000 रुपये अनुदान दिले जाते.
  • मेंढ्यांसाठी संतुलित पशुखाद्य पुरवण्यासाठी 50% अनुदान दिले जाते.
  • भुमिहीन पशुपालकांना मेंढीपालनासाठी जागा खरेदीसाठी किंवा भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठी जागेच्या किंमतीवर 75% अनुदान दिले जाते.
  • सुधारित देशी प्रजातीच्या 100 कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदीसाठी 75% अनुदान दिले जाते.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना

या योजनेंतर्गत मेंढीपालन करण्यासाठी स्थायी स्वरूपात पायाभूत सोयीसुविधांसह २० मेंढ्या आणि १ मेंढानर असलेला गट ७५% अनुदानावर दिला जातो. स्थलांतरीत पद्धतीने मेंढीपालनासाठी देखील याच प्रकारचे अनुदान दिले जाते. ज्यांच्याकडे स्वतःच्या २० ते ४० मेंढ्या आहेत त्यांना १ सुधारित नरमेंढा ७५% अनुदानावर दिला जातो. तसेच, ज्यांच्याकडे ४० ते ६० मेंढ्या आहेत त्यांना २ नरमेंढे, ६० ते ८० मेंढ्या असलेल्या लाभार्थ्यांना ३ नरमेंढे, आणि ८० ते १०० मेंढ्या असलेल्या लाभार्थ्यांना ४ नरमेंढे अनुदानावर वाटप केले जातात.

ज्यांच्याकडे १०० किंवा त्याहून अधिक मेंढ्या आहेत त्यांना ५ सुधारित नरमेंढे ७५% अनुदानावर दिले जातात. स्थायी मेंढीपालनासाठी २० मेंढ्या व १ मेंढानर असलेल्या गटांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान दिले जाते. स्थलांतरित पद्धतीच्या मेंढीपालनासाठी देखील याच प्रकारचे अनुदान दिले जाते.

या योजनेत संतुलित खाद्य उपलब्ध करण्यासाठीही अनुदानाचा समावेश आहे. स्थायी स्वरूपात मेंढीपालन करणाऱ्यांसाठी एप्रिल ते जुलै महिन्यांपर्यंत १०० ग्रॅम प्रती दिन प्रती मेंढी या प्रमाणे संतुलित खाद्य ७५% अनुदानावर दिले जाते. स्थलांतरित मेंढीपालन करणाऱ्यांसाठी जून ते जुलै महिन्यांमध्ये खाद्य उपलब्ध करून दिले जाते.

तसेच हिरव्या चाऱ्याचे मुरघस करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान दिले जाते. पशुखाद्या कारखाने उभारण्यासाठीही ५०% अनुदान दिले जाते.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना महाराष्ट्रातील भटक्या जमाती व धनगर समाजातील नागरिकांना आर्थिक स्थैर्य व रोजगाराची संधी देणारी प्रभावी योजना आहे. मेंढीपालनासह विविध सहाय्यक अनुदाने या योजनेतून उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला उपयोग होतो.

योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया सुरू करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

1.प्रश्न: शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार किती देते अनुदान?

उत्तर: शेळीपालन योजनेसाठी राज्य सरकार अनुसूचित जाती जमातीसाठी 75 टक्के तर खुल्या प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान देते.

2.प्रश्न: शेळीपालन योजनेसाठी कोण अर्ज करू शकते?

उत्तर: शेळीपालन योजनेसाठी महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिक अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

3.प्रश्न: कोणामार्फत शेळीपालन योजना राबवली जाते?

उत्तर: महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागात अंतर्गत शेळी पालन योजना राबवली जाते.शेतकरी आपल्या शेतीसोबतही जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करू शकतात

4.प्रश्न: शेळीपालन योजनेसाठी अर्ज कुठे करावा?

उत्तर: शेळीपालन योजनेसाठी ऑनलाईनही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊनही किंवा जिल्ह्याच्या कृषी विभागात जाऊनही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि लाभ घेऊ शकता.

5.प्रश्न: शेळीपालन योजना सुरू करण्याचा उद्देश काय?

उत्तर: राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू करता येतो. तसेच राज्यातील बेरोजगार तरुणांनाही या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यास करता येतो.