राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

अकोल्यात 1000 ते 1500 रुपये

अकोला : येथील जनता भाजी बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात काकडीची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी (ता. 26 ) येथील बाजारात काकडी किमान 1000 रुपये आणि कमाल 1500 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली. बाजारात सुमारे 50 क्विंटल पेक्षा अधिक आऊट झाली. जून महिन्यात बाजारात काकडीच्या आवक जिल्ह्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात व्हायला सुरत होत असते. यंदाही ही आवक सुरुवातीपासून वाढलेली आहे. बाजारात काकडीची किरकोळ विक्री 20 ते 30 रुपये दरम्यान प्रति किलोने केली जात आहे. या पुढील काळात काही दिवस काकडीचे आवक आणखी वाढणे शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.त्यामुळे काकडीचे दर सध्या सुधारण्याची तितकी चिन्ह दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

परभणी 1200 ते 2000 रुपये

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजपाला मार्केटमध्ये गुरुवारी ( ता. 26 )काकडीची 125 क्विंटल आवक होती. काकडीला प्रतिक्विंटल किमान 1200 ते कमाल 2000 रुपये, तर सरासरी 1600 रुपये दर मिळाले. अशी माहिती मार्केट मधील सूत्रांनी दिली .सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच हिंगोली जिल्ह्यातून काकडीची प्रतिदिन सरासरी 100 ते 150 क्विंटल आवक होत आहे .मागील महिन्यात काकडीची 70 ते 225 क्विंटल झाली. त्यावेळी प्रत्येक 800 ते 2500 रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. 26 ) काकडीची 125 क्विंटल आवक 1200 ते 2000 रुपये होते, तर किरकोळ दर प्रति किलो 20 ते 40 रुपये होते, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

पुण्यात 2000 ते 3000 रुपये

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. 26 )काकडीची सुमारे 8 टेम्पो आवक झाली होती. यावेळी 10 किलोला 200 ते 300 रुपये दर होता. सध्या आवक आणि मागणी संतुलित असल्याने दर स्थिर असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले. दरम्यान पॉलिहाऊस मधील संकरित पाणीदार चायना काकडीचे आवक हळूहळू सुरू होत असून, त्याची दर 250 ते 300 रुपये असल्याची माहिती त्यांनी सांगितली.राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

जळगावत 1800 ते 2600 रुपये दर

जळगाव: बाजार समितीत गुरुवारी( ता. 26) काकडीची 18 क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल 1800 ते 2600 व सरासरी 2200 रुपये असे मिळाले. जिल्ह्यात किंवा खानदेशात काकडी लागवड बऱ्यापैकी झाली आहे .यामुळे स्थानिक क्षेत्रात आवक स्थिर आहे. रोज आवक होत आहे. या महिन्यात आवक प्रतिदिन सरासरी 16 क्विंटल राहिली आहे. यामुळे दर काहीसे स्थिर आहेत. उठाव बरा आहे. पुढे आवक कमी होईल अशी स्थिती आहे. आवाक जामनेर, चोपडा, जळगाव आदी भागातून होत आहे. सर्वाधिक आवक जामनेर भागातून होत आहे.

राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

कोल्हापुरात 1000 ते 3000 हजार रुपये

कोल्हापूर :येथील बाजार समितीत काकडीच दहा किलो 100 ते 300 रुपये इतका दर मिळत आहे. काकडीची दररोज 150 ते 200 बॉक्स आवक होत आहे. सध्या कोल्हापूर जिल्हा बरोबर बेळगाव जिल्ह्यातून ही काकडीची आवक सुरू असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

नाशिक मध्ये 2500 ते 4500

नाशिक: कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 25 )रोजी काकडीच्या व 457 क्विंटल होती. ती प्रतिक्विंटल 2500 ते 4500 दर मिळाला. सर्वसाधारण दर 3750 राहिला,अशी माहिती बाजार समितीच्या सुत्रानी दिली. बाजार समितीत काकडीची आवक सर्वसाधारण आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत आवक कमी झाल्याचे दिसून आले .सुरू असलेल्या पावसामुळे काकडी खुडे करताना अडचणी येत आहे. त्यामुळे सध्या गेल्या चार दिवसापासून आवक कमी झाले चित्र आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने बाजार भावात वाढ झाली आहे. मंगळवार( ता. 24 )रोजी आवक 468 क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल 2500 ते 4625 दर मिळाला .सर्वसाधारण दर 4000 राहिला, सोमवारी ( ता. 23) 515 क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल 2500 4500 दर मिळाला. सर्वसाधारण दर 4000 राहिला.रविवार ( ता. 22 )रोजी आवक 978 क्विंटल होती.तिला प्रतिक्विंटल 750 ते 2625 साधन मिळाला. सर्वसाधारण दर 1600 राहिला. शनिवारी (ता. 21) रोजी आवक 1218 क्विंटल होती.तिला प्रतिक्विंटल 1000 ते 2500 असा दर मिळाला. सर्वसाधारण दर 1750 राहीला . शुक्रवार ( ता. 20) रोजी आवक 830 क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल 2000 ते 4000 चा दर मिळाला .सर्वसाधारण दर 3000 राहिला. गुरुवारी( ता. 19) रोजी आवक 952 क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल 1250 ते 30000 मिळाला.सर्वसाधारण दर 2000 राहिला.राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल

सोलापुरात सर्वाधिक 6000 रुपये दर

सोलापूर: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात काकडीची आवक कमी झाली.पण मागणी असण्याने काकडीला चांगला उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीचे आवक गत सप्ताहात काकडीची आवक रोज 20 ते 30 क्विंटल पर्यंत राहिली .गेल्या काही दिवसांपासून काकडीच्या ओके सातत्याने घट होत आहे .पण मागणी असल्याने दरात मात्र सातत्याने किरकोळ चढउतार वळगळता सुधारणा होत आहे. या सप्ताहात पुन्हा कमी आवक आणि वाढते मागणी यांच्यात तूट निर्माण झाल्याचे काकडीचे दर चांगले वाढले. काकडीला प्रतिक्विंटलला किमान 1000 रुपये, सरासरी 3000 रुपये आणि आता सर्वाधिक 6000 रुपयांचा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही दरात असेच 100 ते 200 रुपयांचा फरक वगळता असेच राहिल्याचे सांगण्यात आले.

कळमना बाजारात 1500 ते 1800 रुपयांवर

कळमना: बाजारात काकडीचे आवक 200 ते 300 क्विंटल वर आहे. काकडीच्या आवकेत अशा प्रकारे सातत्याने चढउतार होत असताना दरात मात्र इतके चढउतार होत नसलेचे सांगण्यात आले. कळमना बाजारात टाकळीला सध्या 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. 18 जून रोजी काकडीचे दर कमी होत 800 ते 1000 रुपये आले होते. त्या दिवशी विक्रमी 300 क्विंटल ची आवक नोंदविण्यात आली. त्यानंतर आवक सरासरी 200 ते 250 क्विंटल व स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 18 जून रोजीचा अपवाद वगळता दर 1200 ते 1500 आणि 1500 ते 1700 रुपये याप्रमाणे मिळत आहे. नजिकच्या मध्यप्रदेशासह राज्याच्या विविध भागांवर विदर्भातील शेतकऱ्यांंद्वारे देखील काकडी बाजारात विक्रीसाठी आणण्यावर भर आहे. त्यामुळेच आवक वाढती असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला.राज्यात काकडी 1000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल