यंदा ८० टक्के हळदीची विक्री|80 % turmeric sales this year 2025

देशात यंदाच्या वर्षात सुमारे ७५ लाख पोती(एक पोते ५० किलोचे ) हळद उत्पादन झाले असून , त्यापैकी 80 टक्के म्हणजे 60 लाख पोत्यांची विक्री झाली आहे . गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात प्रति क्विंटल दीड हजार रुपयांनी दर दबावात आहेत .त्यामुळे शेतकर्यांनी हळद विक्री थांबवली असून ,15 लाख पोती शेतकर्यांकडे हळद शिल्लक असल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे .

यंदा ८० टक्के हळदीची विक्री|80 % turmeric sales this year 2025

देशात गत वर्षी हळद लागवडीचा घटीचा अंदाज व्यक्त केला होता .त्यामुळे हळदीचे उत्पादन वकमी होईल असे या उद्यागातील जाणकारांनी म्हंटले होते .मात्र तेलंगाना ,मध्य प्रदेश ,आंध्र प्रदेश या राज्यांत हळदीचे क्षेत्र वाढले ,तर महाराष्ट्रत हळदीच्या क्षे त्रात मोठी घटझाली . इतर राज्यात कमी -अधिक क्षे त्रावर हळदीची लागवड झाली .त्यामुळे काही ठिकाणी हळदीचे उत्पादन कमी तर काही ठिकाणी उतपादानात वाढ झाली . त्यामुळे हळद उद्योगातील हळद उत्पादनाचे अंदाज फोल ठरल्याचे चित्र आहे . यंदा ८० टक्के हळदीची विक्री|80 % turmeric sales this year 2025

देशात हळदीचे 5 लाख पोत्यांचे उत्पादन झाले असल्याचे हळद व्यापार्यांनी सांगितले . गट वर्षी हळद विक्रीच्या प्रारंभापासून हळदीचे दर तेजीत राहिले .या दरम्यान ,हळदीला मागणीही असल्याने उठावही लवकर झाला . त्यामुळे बाजारपेठेत हळदीची विक्री झपाट्याने झाली .तमिळनाडूतील इदोरमध्ये वर्षभर हळदीची विक्री सुरु राहते .त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने विक्री सुरु ठेवली आहे .यंदा ८० टक्के हळदीची विक्री|80 % turmeric sales this year 2025

गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात प्रति क्विंटलला १००० ते १५०० रुपयांची घसरण झाली आहे .त्यातच हळदीची मागणीही कमी झाली असल्याने उठावही कमी झाला आहे .त्यामुळे शेतकरी हळद विक्रीसाठी थांबले आहेत .त्यामुळे बाजारात हळदीची आवक काहींशी मंदावली आहे .मराठवाडा ,तेलंगाना यांसह अन्य भागात हळदीची आवक सुरु आहे . परंतु दर घटल्याने हळदीच्या दरात वाढ होण्याची प्रतीक्षा शेतकरी करू लागला आहे .

मसाला उत्पादन करणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी हळद खरेदी केली आहे .त्यामुळे या कंपन्या बाजारात हळद खरेदीसाठी येत नाहीत .सध्या हळदीच्या दर्जानुसार प्रति क्विंटल 12 हजार ते १३५०० रुपये असा दर मिळत आहे .

देशातून हळदीची मोठ्या मोठ्या प्रमाणात निर्यात होते .निर्यातक्षम हळदीला १५००० रुपये प्रति क्विंटल असा दर होता .मात्र निर्यातीचे दरही घटले आहे .सध्या निर्यातीक्षम हळदीला १३५०० रुपये असा दर मिळत असून उठावही कमी झाला आहे .भारत-पाकिस्तान युद्धाचा फटका हळद व्यापारावर परिणाम झाला आहे .बांगलादेशातही हळदीची मागणी कमी झाली आहे .असे व्यापाऱ्यांनी सांगतले .यंदा ८० टक्के हळदीची विक्री|80 % turmeric sales this year 2025

यंदा क्षेत्र वाढीची शक्यता

यंदाच्या हंगामातील हळद लागवड सुरु झाली आहे . या हंगामात हळद लागवडीचे क्षेत्र वाढले असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जात आहे .त्यामुळे देशातील हळदीचे क्षेत्र वाढेल ,अशी शक्यता उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केली आहे .देशात पाऊसही चांगला असल्याने पीकही चांगले येईल , त्यामुळे पुढील वर्षी हळदीचे उत्पादनही वाढेल ,असा अंदाज व्यक्त केला जात आहे .परंतु देशातील हळद लागवडीचे चित्र ऑगस्ट महिन्यात स्पष्ट होईल .