मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात २०२५

मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात २०२५

शेतीच्या कामाना येणार वेग

मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात २०२५

आज गुरुवार दिनांक 08 जून रोजी सायंकाळी 06 वाजून 53 मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत आहे. वाहन हत्ती आहे. रोहिणी संपून आज मृग नक्षत्र सुरू होईल. या नक्षत्रामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण रोहिणी नक्षत्रात पाऊस फार कमी पडल्यामुळे आता शेतकरी लोकांचे डोळे मृग नक्षत्राकडे लागले आहेत. या नक्षत्रात शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात 25 मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले होते. ते आज 08 जून रोजी सायंकाळी संपेल आणि सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करेल. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची रोहिणी नक्षत्राने निराशा केली. मिर्गी किडे या नक्षत्रात बाहेर पडतात, असे सांगितले जाते

राज्यात कृषि विश्वासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि लाखो बळी राज्यांच्या आशा पल्लवित करणाऱ्या मृग नक्षत्राला रविवार ,दि.८जून पासून सुरुवात होत आहे .या नक्षत्राकडे केवळ एक खगोलीय घटना म्हणून न पाहता ,शेतकऱ्यांच्या संपूर्ण वर्षाच्या मेहनतीचे आणि समृद्धीचे प्रवेशद्वार म्हणून पहिले जाते .

हिंदू पंचांगानुसार वर्षभरात येणा-या 27 नक्षत्रांपैकी 9 नक्षत्रं ही पावसाची असतात. ‘नक्षत्रं आणि दरवर्षी त्यांची बदलणारी वाहनं’ ही अत्यंत मजेशीर आणि तितकीच संशोधनात्मक बाब आहे. पावसाच्या नक्षत्रांची सुरुवात ही जरी ‘रोहिणी’ नक्षत्रापासून होत असली, तरी पावसाच्या आगमनाचा खरा हर्षोल्हास हा ‘मृग’ नक्षत्रापासूनच सर्वत्र साजरा केला जातो. मृगशीर्ष नक्षत्राशी सूर्य आला की भारतात पावसाळा सुरू होतो. शेतकरी या वेळेला ‘मृग लागले’ असे म्हणतात,

‘मृग नक्षत्र’ हे आकाशमंडपातलं वैशिष्टयपूर्ण देखणं असं नक्षत्र मानलं जातं. युगानुयुगांपासून सामान्यत: 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो असे मानले जाते. ‘मृग नक्षत्र आणि पहिल्या पावसाची’ ओढ ही केवळ कवींनाच नाही, तर समस्त भारतीय समाज माणसाला लागलेली असते. 

सामान्यत: 7 किंवा 8 जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. ‘मृग’ हे आकाशमंडपातलं एक विशेष देखणं नक्षत्र. हरिणाचे चार पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि लगतच असलेला तेजस्वी व्याध तारा, असा भासणारा हा तारकासमूह मार्गशीर्ष महिन्यात पूर्ण रात्रभर आकाशात दिसतो. जूनमध्ये आकाशात मृग नक्षत्र दिसतच नाही, कारण सूर्याच्या सान्निध्यात त्याचं तेज लुप्त होत असतं.

पारंपारिक भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार ,सूर्य जेव्हा मृग नक्षत्रात प्रवेश करतो ,तेव्हापासून मान्सूनच्या आगमनाला अधिकृत सुरुवात होते ,असे मानले जाते .राज्यातील शेतकरी याच नक्षत्राच्या पावसावर भात ,ज्वारी ,बाजरी ,कापूस ,सोयाबीन आणि कडधान्ये यासारख्या प्रमुख खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन करतात .मृगाच्या पहिला पाऊस जमिनीची तहान भागवून तिला पेरणीयोग्य बनवतो ,त्यामुळे या पावसाला अमृतधारा मानून त्याचे स्वागत केले जाते .

या नक्षत्रात पेरणी केल्यास पिकांची वाढ जोमदार होते ,त्यांना कीड रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि भरगोस उत्पन्न मिळते ,असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे .त्यामुळे मृग नक्षत्र लागण्यापूर्वीच शेतकरी बांधव शेतीची नागरणी ,वखरणी ,खताची जुळवाजुळव आणि उत्तम प्रतीच्या बियाण्यांची निवड अशा कामांमध्ये व्यस्त दिसतात .अनेक ठिकाणी मृग नक्षत्राच्या आगमनानिमित ग्रामदैवताना चांगल्या पावसासाठी आणि सुफलतेसाठी प्रार्थनाही केल्या जातात .

मृग नक्षत्राचे आगमन हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ पंचांगातील एक बदल नसून ,ते त्यांच्या श्रमाचे ,आशेचे आणि भविष्यातील समृद्धीचे प्रतिक आहे .या नक्षत्राच्या दमदार सुरवाती वरच राज्याच्या कृषि अर्थ व्यवस्थेचा मोठा डोलारा आणि अन्नसुरक्षेची हमी अवलंबून असते .

मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र पाऊस आता लांबणार असल्याची माहिती मिळत आहे. पावसाचं उशिरा आगमन होणार असल्याने आता शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी थांबावे लागणार आहे.

आजपासून मृग नक्षत्र, मृगाच्या मुर्हूतावर येणाऱ्या पावसाने मात्र दांडी मारली आहे. मान्सून 15 जूननंतर येण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज मान्सून पूर्व पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे.