बदक,कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातीचे संगोपन 2025

बदक,कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातीचे संगोपन  2025

सोलापूर जिल्ह्यात कामती खुर्द येथील अरुण शिंदे व कुटुंबीयांनी सुरू केलेल्या प्रो-शक्ती ऍग्रो फार्म या शेतीपूरक उद्योगाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. बदके व कोंबड्या यांच्या वैशिष्ट्यपूर्ण, नविन्यपूर्ण जातीच्या संगोपनातून व विक्रीतून अत्यंत व्यावसायिक पद्धतीने उद्योगांचा विस्तार करीत त्यांचा लौकिक राज्यातील विविध भागांसह विविध राज्यांपर्यंत पोहोचविण्यात हे कुटुंब यशस्वी झाले आहे.

बदक,कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातीचे संगोपन 2025

सोलापूर मंगळवेढा मार्गावर कामठी खुर्द ,तालुका-मोहोळ येथे गावा अलीकडे रस्त्यालगत अरुण शिंदे कुटुंबियाची चार एकर शेती आहे. उस हे प्रमुख पीक. हंगामात तूर , उडीद यांसह चारपिके ते पूर्वी घेत.अरुण यांचे वडील औदुंबर शेती पाहत गावात पिठाची गिरणी चालवतात. अरुण हे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकमुनिकेशन इंजिनियरिंग विषयाचे पदवीधर असून बंगळूर येथील नामांकित कंपनीत नोकरी करतात. मात्र जाऊन-येऊन ते घर व शेतीची जबाबदारी सांभाळतात. धाकटे बंधू विक्रम ‘आयटीआय, उत्तीर्ण झाले असून ते वडिलांना शेतीत पूर्णवेळ मदत करतात. केवळ शेतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी कुटुंबीयांनी पूरक उद्योगांकडे वळवण्याचा निर्णय घेतला. बघता फक्त आठ वर्षात भरारी घेतलेल्या त्यांच्या नावीन्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण बदक व कोंबडीपालन उद्योगाकडे आज सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अशी मिळाली उद्योगाची वाट

अरुण शिक्षणानंतर 2017 मध्ये हैदराबाद येथे कंपनी नोकरीसाठी होते.तेथे सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही केंद्रशासनाची संस्था कार्यरत आहे. त्याद्वारे राष्ट्रीय प्रदर्शनात विविध जातीची बदके, भरपूर अंडी देणाऱ्या, जास्त मांसाच्या कोंबड्या त्यांच्या पाहण्यात आल्या. त्यात भारतभरातील पक्षी होते हा उद्योग आपल्यासाठी उत्तम ठरू शकतो यांच्या लक्षात आले. पण अडचण अशी होती की घर पूर्णतः वारकरी संप्रदायाचे होते. त्यामुळे आई-वडिलांना हा उद्योग चालेल का असा प्रश्न होता. अपेक्षे प्रमाणे विरोधी झाला. पण अरुण यांनी पक्षी पालन आणि विक्री एवढाच उद्देश ठेवून उत्पन्न स्त्रोत वाढविण्याविषयी पटवून दिले आणि उद्योगाचा श्री गणेशा झाला. पुढे 2020 मध्ये पुणे तर आता बेगलोरला नोकरीला गेले . मात्र नोकरी करतच हा उद्योग त्यांनी हळूहळू वाढवत नेला.

बदक,कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातीचे संगोपन  2025

हजारांच्या संख्येने बदके, कोंबड्या

आज शिंदे यांच्या फार्ममध्ये इंडियन गीझ, व्हाईट पेंकिग, इंडियन रनर ,मस्कोवी आदी विविध जातीची देखणी 300 बदके , 700 पिल्ले आहेत.ब्लॅक आॅस्ट्रोलाॅर्प (संकरित देशी ) व कावेरी जातीच्या प्रत्येकी 250 कोंबड्या, 750 पिले,टर्की वाणाच्या 200 तर झुंजीच्या सहा कोंबड्या आहेत. चार शेळ्या ,सात जर्सी गाई आणि एक म्हैस आहे. सुमारे 25 ते 50 पक्षांपासून सुरू झालेला उद्योग आज हजाराहून अधिक पक्षांच्या घरात पोहोचला आहे. बारा गुंठ्यात प्रत्येकी अडीच हजार चौरस फुटांची तीन शेडस आहेत. त्यात स्वतंत्रपणे बदके, कोंबड्या व पिलाची व्यवस्था आहे. बाजुला मुक्त गोठा आहे. त्यात पाण्याचा हौद आहे. कधी पाण्यात , कधी जमिनीवर बदके मुक्त संचार करतात.

असे केले उद्योगाचे प्रमोशन

बदके व कोंबड्यांच्या नव्या जातीचे मार्केटिंग-विक्री हे आव्हान होते . मात्र अभियंते अरुण यांनी आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करीत सोशल मीडियाद्वारे प्रमोशन सुरू केले. प्रो-शक्ती अॅ ग्रो फार्म ब्रँड तयार केला. स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू करून बदके व कोंबड्यांच्या विविध जाती, वैशिष्ट्ये, त्यांचे व्यावसायिक महत्त्व आदी माहिती देण्यास सुरुवात केली. आज सोलापूरच नव्हे तर लातूर, धाराशिव, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारासह तेलंगाना ,आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातपर्यंतचे ग्राहक त्यांनी मिळवले आहे. त्यासाठी साखळी मार्केटिंगही सुरू केली आहे.

बदक,कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातीचे संगोपन  2025

बाजारपेठ, विक्री व्यवस्था

  • बदके, कोंबड्यांच्या पिल्लांची जन्मापासून एक दिवस ते तीन महिनेअशी वयानुसार विक्री.
  • बदकांच्या वाईट पेकिंग आणि मास्कोविच्या तीन महिने वयाच्या प्रति जोडीची विक्री बाराशे रुपयांच्या दरम्यान. हे ब दक मास आणि अंडी उत्पादनासाठी उपयुक्त.
  • घरगुती व शेतीच्या राखणीसाठी सर्वाधिक उपयुक्त बदक म्हणून इंडियन गिझची ओळख.
  • त्यांच्या पिलाची हजार रुपये, तर प्रोैढ प्रति जोडीची पाच हजार रुपये दराने विक्री.
  • इंडियन आणि चायनीज गिझ या दीड वर्ष वयाच्या बदकाच्या नर-मादी जोडीला मिळतो पाच हजार रुपये दर.
  • ब्लॅक आॅ स्ट्रोलॉर्पचे एकदिवसीय पिलू प्रति 40 रुपये, एक महिन्याचे पिलू १३५ रुपये, तर तीन महिन्याची कोंबडी सातशे रुपये अशी होते विक्री. कोंबडीचे वजन सर्वाधिक दोन ते चार किलो पर्यंत.

एकत्रित कुटुंबाची ताकद

उद्योगात अरूण शिंदे यांना वडील औदुंबर, आई शशिकला यांच्यासह आजी सुंदराबाई,अरुण यांची पत्नी विनया, विक्रम यांची पत्नी मुक्ता अशा सर्वांचे पाठबळ मिळते. सर्व जण हिरीरीने काम करतात. एकत्रित कुटुंबाची ताकद हेच त्यांच्या यशाची गमक आहे.

बदक,कोंबड्यांच्या नावीन्यपूर्ण जातीचे संगोपन  2025

शेतीसाठी उपयुक्त पक्षी

कर्कश आवाज हा बदक व टर्की कोंबड्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे. त्यामुळे शेतात. घरात नेहमी जाग ठेवण्याचे काम ते करतात. सापाला आवाज ऐकू येत नसला तरी कर्कश ओरडण्याचे त्या लहरीची कंपने सापाला जाणवतात. त्यामुळे ते शेत, गोठयाकडे फिरकत नाहीत. या गुणांमुळे हे पक्षी शेतीसाठी उपयुक्त असल्याचे कारण सांगतात.