( भारत सरकार व महाराष्ट्र शासनाची योजना,एआयसी द्वारा लागू ) Pradhanmantri Pik Vima Yojana प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४-२५

फसल बिमा कराओ सुरक्षा कवच पाओ रब्बी २०२४-२५
महाराष्ट्रात अतिवृष्टी , अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे.
Pradhanmantri Pik Vima Yojana प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४-२५
योजनेच्या प्रमुख बाबी
सहभाग प्रक्रिया :
विमा पात्र शेतकरी : कर्जदार ,बिगर कर्जदार , भाडेपट्टीवर शेती करणारे ई.सर्व शेतकरी .
कर्जदार शेतकरी : Pradhanmantri Pik Vima Yojana प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४-२५व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे तथापि ज्या कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचना पिकांचा विमा करावयचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम दिनाकांच्या ७ दिवस आधी अनिवार्य संबंधीत बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा संबंधीत बँकेमार्फत करण्यात येईल.
बिगर कर्जदार शेतकरी : ऐच्छिक बिगर कर्जदार शेतकर्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून ७/१२ उतारा , आधार कार्ड ,बँक पासबुक ,पेरणी घोषणापत्र व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत /विमा माध्य्स्थान्द्वारे / सीएससी केंद्रात संकेतस्थळावर अंतिम मुदती पूर्वी जमा करावी .
कुळाने अगर भाडेपट्टी कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेला भाडेपट्टी करार ( Registered Agreement ) अपलोड करणे बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांसाठी पीक विमा हप्ता फक्त १ रुपया प्रति अर्ज Pradhanmantri Pik Vima Yojana प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४-२५
विमा संरक्षित बाबी : योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती (गारपीट , भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास , ढगफुटी , वीज कोसळल्यामुळे लग्नी नैसर्गिक आग ) व काढणी पक्षात नुकसान भरपाई ( गारपीट चाक्रीवादळ , चाक्रीवादाळामुळे आलेला पाऊस व बिगर मोसमी पाऊस ) या बाबी अंतर्गत सुकवणी साठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणी नंतर 14 दिवसा पर्यंत झालेल्या नुकसानाची पूर्व सूचना नुकसानीच्या 72 तसाच्या आत Crop Insurance App / कृषि रक्षक संकेतस्थळ सहायता क्रमांक / संबंधीत बँक / कृषि विभाग यांना द्यावी . सदरची जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांनाच लागू होईल .Pradhanmantri Pik Vima Yojana प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२४-२५
योजने अंतर्गत अधिसूचित क्षेत्रात पीक विमा प्रयोगाद्वारे निश्चित होणारे पिकांचे सरासरी उत्पनाची उंबरठा उत्पनाची तुलना करून येणाऱ्या घटीनुसार व योजनेच्या मार्गदर्शक सूचनेच्या अधीन राहून अधिसूचित क्षेत्रात नुकसान भरपाई निश्चित केली जाते .

बँक , सी एससी केंद्र व विमा मध्याथांद्वारे विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख :
गहू ( बागायत ),हरभरा ,रब्बी कांदा -१५ डिसेंबर,२०२४ आणि उन्हाळी भात , उन्हाळी भुईमुग -३१ मार्च २०२५
त्वरा करा | बँक शाखा /सी.एस.सी. केंद्रामध्ये शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकांचा विमा अंतिम मुदतीच्या आधीच होईल ह्याची खात्री करा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी योजनेचे परिपत्रक व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना वाचावी ,ती www.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे . जिल्हा किंवा तालुका विमा कंपनी प्रतिनिधीशी संपर्क साधावा .
*योजनेच्या सर्व अटी व मार्गदर्शक सूचना लागू . **अधिसूचित पिके , अधिसूचित महसूल मंडळाची यादी व महाराष्ट्र शासनाची अधिसूचना नजीकच्याबँक शाखेत ,सहकारी पतपुरवठा संस्था यांचेकडे उपलब्ध आहे .