मत्स्यपालन व्यवसायातील सर्वात कठीण टप्पा म्हणजे उत्पादन केलेल्या जिवंत माशांना सुरक्षितपणे, वेळेत आणि दर्जेदार स्थितीत बाजारपेठेत पोहोचवणे. भारतातील विविध राज्यात मत्स्य बीज वाहतूक मासे यांची मागणी वेगाने वाढत आहे. पारंपारिक वाहतूक पद्धतीमध्ये प्लॅस्टिक पिशवी, ड्रम, पाण्याच्या टाक्या वापरताना वाहतुकी दरम्यान पाण्यातील ऑक्सिजन संपणे, तापमान नियंत्रित न राहणे, अमोनियाचे प्रमाण वाढणे, माशांना ताण येणे,कंपन व धक्क्यांमुळे इजा होणे. प्रवास विलंब होणे इत्यादी कारणांमुळे माशांचा मृत्यू दर वाढतो. या समस्यांमुळे आर्थिक नुकसान होते. मत्स्यपालकांच्या पर्यंत दर्जेदार मासिक पोहोचवणे कठीण होते.

जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग
स्मार्ट कॅरी बॅगचा वापर
जिवंत माशांच्या वाहतुकीमध्ये येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी स्मार्ट कॅरीबॅग फायदेशीर आहेत. या बॅग विशेष बहुपदरी आहेत. उच्च दर्जाच्या फूड ग्रेट प्लॅस्टीक पासून बनवलेल्या आहेत. या जल रोधक परंतु, ऑक्सिजन पारगम्य आणि मजबूत असतात. बॅगची रचना अशा प्रकारे आहे, की ज्यामुळे वाहतुकी दरम्यान पाण्यातील ऑक्सिजनची पातळी टिकून राहते, माशांना पुरेशा प्रमाणात श्वसनासाठी ऑक्सिजन मिळतो. वाहतुकी दरम्यान पाण्याची गळती रोखली जाते. हाताळणी करताना पाण्याची गळती होऊन माशांना इजा होण्याचा धोका कमी होतो, माशांची संरक्षण होते.जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग
‘मायक्रो-बबल एरेशन’ चे महत्व :
स्मार्ट कॅरी बॅगची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे मायक्रो-बबल एरेशन पद्धती. पारंपारिक एरेशन मध्ये मोठ्या बबल्समुळे ऑ क्सिजनचे वितरण प्रभावी होत नाही. मायक्रो-बबल तंत्रामुळे लहान बुडबुड्याच्या माध्यमातून पाण्यात अधिक प्रमाणात ऑक्सिजन विरघळतो. यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण प्रवासादरम्यान टिकून राहते, ज्यामुळे माशाच्या श्वसनास मदत होते. ताण कमी राहतो. प्रवास लांब असला तरी ऑक्सिजनची कमतरता भासत नाही, जी पारंपारिक पद्धतीतील सर्वात मोठी समस्या आहे.जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग
पारंपारिक वाहतूक आणि स्मार्ट कॅरी बॅग वापराची तुलना
मुद्दा | पारंपारिक वाहतूक पद्धत | स्मार्ट कॅरी बॅगसरत पद्धत |
पाणी व ऑक्सिजन व्यवस्थापन | जास्त पाण्याची आवश्यकता,ऑक्सिजन पटकन संपतो . | कमी पाण्यात मायक्रो-बबल एरेशनद्वारे ऑक्सिजन टिकवता येतो. |
तापमान नियंत्रण | तापमान नियंत्रण ठेवणे कठीण,उन्हात पाणी गरम होते. | जेल पॅक्सद्वारे तापमान नियंत्रित ठेवता येते. |
अमोनिया व्यवस्थापन | अमोनिया वाढल्यास माशांना ताण व मृत्यू दर वाढतो. | अमोनिया शोषक फिल्टर लावता येतो.पाणी स्वच्छ राहते. |
हाताळणी सुलभता | ड्रम,टाक्या उचलणे कठीण,गळतीची शक्यता जास्त. | हँडल्ससह बॅग हलक्या ,वाहतूक सोपी. |
निरीक्षण | पाण्यात मासे पाहणे कठीण ,निरीक्षण मर्यादित, | पारदर्शक बॅगमुळे माशांचे निरीक्षण सुलभ. |
वाहतूक खर्च | जास्त पाणी व वजनामुळे वाहतूक खर्च जास्त. | कमी पाणी व वजनामुळे वाहतूक खर्चात बचत. |
जैवसुरक्षा | संसर्ग व पाण्याचे प्रदूषण होण्याचा धोका. | स्वच्छ,बंद पद्धतीमुळे संसर्गाचा धोका कमी. |
शाश्वतता व पर्यावरणीय परिणाम | सिंगल-युज प्लास्टिकचा कचरा तयार होतो. | पुन्हा वापरण्यायोग्य ,पर्यावरण पूरक . |
माशांचा मृत्यू दर | तुलनेत जास्त मृत्यू दर. | मृत्यू दरात लक्षणीय घट. |
मार्केट पोहोच क्षमता | प्रवासातील ताणामुळे दूरवर पाठवणे कठीण होते. | जास्त अंतराच्या प्रवासात सुरक्षित वाहतूक . |
तापमान नियंत्रण, प्रवासातील ताण कमी करणे:
भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात पाण्याचे तापमान वाहतुकी दरम्यान झपाट्याने वाढते, त्यामुळे माशांना ताण येतो, मृत्यू होण्याचा धोका वाढतो. स्मार्ट कॅरी बॅगमध्ये थंडच जेल पॅक्स किंवा तापमान नियंत्रक उपकरणे ठेवून पाण्याचे तापमान नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे उन्हाळ्यातील कडक उष्णतेत किंवा प्रवासातील उष्ण वातावरणात पाण्याचे तापमान स्थिर राहते. माशांना त्यांचे नैसर्गिक तापमान मिळाल्यामुळे आरोग्य टिकते, हालचाल सामान्य राहते , प्रवासादरम्यान ताण येत नाही.जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग
अमोनिया शोषण, पाण्याची गुणवत्ता टिकविणे :
वाहतुकी दरम्यान माशांच्या मलमुत्रामुळे पाण्यात अमोनिया तयार होतो, जो माशांच्या आरोग्यास हानिकारक असतो. अमोनिया श्वसनास अडथळा आणतो,माशांमध्ये ताण निर्माण करतो. स्मार्ट कॅरी बॅगमध्ये अमोनिया शोषुन घेणारे विशेष कार्बन फिल्टर ठेवता येतात, जे पाण्यातील अमोनिया शोषुन घेतात, पाण्याची गुणवत्ता राखतात. त्यामुळे लांब प्रवासादरम्यान सुद्धा पाणी स्वच्छ राहते, माशांना सुरक्षित वातावरण मिळते. माशांच्या मृत्यू दरात लक्षणीय घट होते.
सुलभ हाताळणी :
स्मार्ट कॅरीबॅग पारदर्शक असतात, त्यामुळे शेतकरी, व्यापारी किंवा वाहतूक करणारे कर्मचारी प्रवासादरम्यान माशांचे निरीक्षण करू शकतात.माशांच्या रंगातील बदल, हालचाल, श्वसन यावर लक्ष ठेवून तात्काळ उपायोजना करता येते. बॅ ग मध्ये मजबूत हँडल्स असल्यामुळे लोडिंग अनलोडिंग करताना बॅग सहजपणे उचलता येतात व माशाना इजा होत नाही. काही प्रगत स्मार्ट कॅरी बॅग मध्ये आरएफआयडी किंवा क्यूआर कोड ट्रॅकिंग पद्धती असते, ज्याद्वारे प्रवासादरम्यान बॅग लोकेशन, तापमान व ऑक्सिजन पातळी ऑनलाईन तपासता येते. त्यामुळे वाहतुकीची पारदर्शकता राखली जाते, व्यवस्थापन सुलभ होते.जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग
खर्च बचत
पारंपारिक पद्धतीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाहतुकीचे वजन वाढते, त्यामुळे हवाई, रेल्वे किंवा रस्त्याने वाहतुकीचा खर्च वाढतो. स्मार्ट कॅरीबॅग मध्ये पाणी कमी पाण्यात जास्त मासे वाहून नेता येतात,या बँक पुन्हा पुन्हा वापरता येतात, त्यामुळे प्लास्टिकचा कचरा कमी होतो, पर्यावरण पूरक व्यवस्था निर्माण होते. यामुळे मत्स्यपालन उद्योगात शाश्वत विकासाला चालना मिळते. स्मार्ट कॅरीबॅगचा वापर हा मत्स्य व्यवसायाच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा भाग आहे.