
राज्यात आज , १ जुलै महाराष्ट्रचे हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात आणि नव्या संकल्पासह साजरा होत आहे. हा दिवस केवळ बळीराजाच्या कष्टाचे स्मरण करण्याचा नाही, तर बदलत्या काळानुसार शेतीसमोर उभी ठाकलेली आव्हाने आणि त्यातून मार्ग काढणाऱ्या संधीचा आढावा घेण्याचाही आहे.
कृषी दिनविशेष|बळीराजाच्या समृद्धीचा नवा ध्यास 2025
यंदाचा कृषी दिन हा पारंपरा आणि तंत्रज्ञान यांच्यातील एक महत्त्वपूर्ण टप्प्यावर साजरा होत आहे.एकीकडे हवामान बदलाचे मोठे संकट शेतकऱ्यांपुढ आ वासून उभे आहे, तर दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञान शेतीला अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनविण्यासाठी आशेचा किरण दाखवत आहे. या दोन्हींच्या संगमातूनच राज्याच्या कृषी क्षेत्राचा भविष्यकाळ उज्वल होणार आहे असे तज्ञांचे मत आहे.
हवामान बदलाचे आव्हान
लहरी पाऊस ,अवकाळी गारपीट आणि वाढते तापमान यासारख्या समस्सयांना तोंड देण्यासाठी हवामान-बदल-सक्षम(climate -resilient ) पिकांच्या जाती आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज बनली आहे.कृषी दिनविशेष|बळीराजाच्या समृद्धीचा नवा ध्यास 2025
तंत्रज्ञानाची कास
ड्रोन द्वारे होणारी अचूक फवारणी, जमिनीच्या आरोग्याची माहिती देणारे साॅइल सेंन्सर्स आणि पिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवणारे सॅटेलाईट तंत्रज्ञान, वादळ पाऊस, हवामान बदल यांची पूर्वकल्पांना देणारे संदेश आता केवळ प्रयोगशील शेतकऱ्यांपुरते मर्यादा राहिलेले नाही. याचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करणे शक्य आहे.
डिजिटल बाजारपेठेचे महत्त्व
‘ई-नाम ‘ सारख्या डिजिटल मंचामुळे शेतकऱ्याला आपला माल थेट देशभरातील व्यापाऱ्यान पर्यंत पोहचण्याची संधी मिळाली आहे .यामुळे मध्यस्थाची साखळी कमी होऊन दोन पैसे अधिक मिळण्याची शक्यता वाढली आहे .
युवा आणि सुशिक्षित पिढीचा सहभाग
शेती तोट्याची आहे,हा समज आता मागे पडत असून अनेक उच्च शिक्षित तरुण नोकरीऐवजी आधुनिक आणि व्यावसायिक शेतीकडे वळत आहेत.अॅ ग्री टुरिझम,अॅ ग्री फार्म ,डेअरी फार्म,प्रक्रिया उद्योग आणि ‘फार्म-टू-फोर्क‘ यासारख्या संकल्पना ते यशस्वीपणे राबवत आहेत.
2025 मधील कृषी दिन हा केवळ उत्सव नसून,तो शेती क्षेत्रासाठी ‘चिंतन दिन’ आहे. शासनाच्या योजना, कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि शेतकऱ्यांची मेहनत या सर्वांची योग्य सांगड घातल्यास महाराष्ट्राची शेती पुन्हा एकदा देशात आपले अग्रस्थान सिद्ध करेल.कृषी दिनविशेष|बळीराजाच्या समृद्धीचा नवा ध्यास 2025
आजच्या दिवशी प्रत्येक नागरिकाने आपल्या ताटातील भाकरी ज्याच्या कष्टातून येते , त्या बळीराजा प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. कारण सध्याच्या अस्थिरतेच्या जीवनात ‘बळीराजा सुखी, तर देश सुखी ‘ हे त्रिकालाबाधित सत्य स्वीकारणे आणि अंगीकारणे हे तितकेच गरजेचे आहे.