कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

ए . आय अर्थात कृत्रिम बुद्धिमता हा आता परवलीचा शब्द झाला असून , ही विज्ञानातील महाक्रांती आहे .जीवनाच्या सर्वच क्षेत्रात ए .आय .चे दूरगामी परिमाणहीझाले आहेत ,होत आहेत आणि होणार आहेत . ए.आय .मुळे मानवी जीवनात आमुलाग्र बदल होऊ घातले आहेत .

कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

सध्याचे युग हे विज्ञान, माहिती तंत्रज्ञानचे युग समजले जाते .या विज्ञान तंत्रज्ञानच्या युगात माहितीचा विष्फोट झालेला आहे . जीवनाच्या सर्व क्षेत्रात संगणकीकरण – कृत्रिम बुद्धिमतेचा प्रचंड प्रमाणात वापर होऊ लागला आहे .सुशिक्षित असो वा असुशिक्षित ,हे कळत नकळत अगदी बेमालूमपणे या तंत्रज्ञानचा वापर तसेच अंगीकार करत आहेत.

कृषी म्हणजेच शेती ,दुग्ध व्यवसाय , पशुपालन ,कृषिपूरक उद्योग यामध्ये देखील हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे .विविध अंगणी याचा वापर प्रत्यक्षरीत्या शेती क्षेत्रात केला जात आहे .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

कृषी क्षेत्रात ए .आय . चा वापर होत असलेली क्षेत्रे अशी :

हवामानाची माहिती :

हवामानाचा अंदाज , त्याचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम , त्यापासून प्रतिबंधात्मक घ्यावयाची काळजी , करावयाच्या उपाययोजना , हवामानानुसार पिकाची ,पिकांच्या जातीची निवड , योग्य पेरणी कालावधी , पेरणीची योग्य पद्धत याची माहिती मिळते.कृषी विस्तार कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करता येते .

पिकांचे सिंचन नियोजन :

पानातील ,जमिनीच्या पृष्ठभागावरील ,जमिनीच्या खोलीवरील ओलाव्याबाबत सेन्सरद्वारे माहिती ,यानुसार पिकला कधी , किती , कसे पाणी द्यावयाचे याचे नियोजन , अंमलबजावणी करता येते . प्रत्येक थेंबाचा अधिक परिणामकारक वापर करता येतो .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

जमिनीची आरोग्य तपासणी :

जलदगतीने जमिनीचे पृथक्करण , यात जमिनीची पाणीधारण क्षमता, इलेक्ट्रिकल कंडक्टीव्हिटी ,नत्र ,स्फुरद , पालाश याची जमिनीतील उपलब्धता , यानुसार द्यावयाची खत मात्रा याचे प्रभावी नियोजन .

पिकांवरील कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव :

हवामान परिस्थितीनुसार संभाव्य कीड रोगाचा प्रादुर्भाव ,त्यावरील प्रतिबंधात्मक ,नियंत्रणात्मक उपाययोजना याची माहिती मिलन अंमलबजावणी केली जात आहे .यांत्रिकीकरण ,साठवणूक , बाजार व्यवस्था इत्यादी बाबीचे काटेकोर नियोजन करता येते . पिकाची वाढ , पीक परिस्थिती बाबत नेमकेपणाने मिळणारी माहिती, योग्य वेळी पिकाची काढणी ,त्या आधारे पिकाचे होणारे उत्पादन याचा उत्कृष्टरीत्या अंदाज घेता येतो .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

कृषी यांत्रिकीकरण :

कृषी क्षे त्रामध्ये रोबोटचा वापर ,ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने फवारणी

शासनाचे धोरण अनुषंगाने नियोजन

पीकविमा :

पिकाची गुणवत्ता व ट्रेस्साबिलीटी या संदर्भातली सुलभरीतीने माहिती .पुरवठा साखळीचे परिणामकारक नियोजन ,पिकाची साठवणूक , शीत साखळी व्यवस्थापन , बाजार व्यवस्थेची सलग्नता, मागणी पुरवठा नियोज ,किमतीबाबत चा अंदाज

सुलभरीत्या ऑनलाइन विक्री सुविधा :

दुग्धव्यवसाय ,पशुपालन ,कृषिपूरक उद्योग संबंधीत नेमकेपणाने नियोजन , अंमलबजावणी बाबत या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे .

कृषिपूरक उद्योग :

कृशिपुरका उद्योगांची निर्मिती शांता,संधी ,धोरणात्मक उपाययोजना ,कच्चा मालाची उपलब्धता, कृषि पक्रिया योजनाचा लाभ , बँक कर्ज प्रकरणे , मालाची साठवणूक ,विक्री ,प्रशिक्षण या बाबी प्रभावी रीतीने कट येऊ लागल्या आहेत .

शेती संदर्भात प्रश्नांची नेमकी मिळणारी उत्तरे :

यामुळे आपली निर्णय क्षमता प्रचंड वाढली असून , त्याद्वारे उपलब्धसंसाधनाचा प्रभावी वापर करत उत्पादन खर्चात ३० ते ४० टक्के कपात होऊन निव्वळ उत्पनात भरीव वाढ होत आहे . जागतिक संधीचा लाभ घेता येत आहे . या बाबी केवळ कृत्रिम बुद्धिमतेमुळे शक्य आहेत .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

महाराष्ट्र राज्यातील कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापराबाबतची काही ठळक उदाहरणे पुढीलप्रमाणे :

थेट लाभ हस्तांतरण योजना :

अनेक योजनाचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिनी नोंदणी , एकाच ठिकाणी एकच अर्ज ,ऑ न ला इन लाॅट री , अर्ज संमती, कागदपत्रे तपासणी , अनुदान वितरण हे सर्व online होऊ लागले . यामुळे योजनाचे प्रभावी नियोजन , अंमलबजावणी शक्य झाली . शेतकऱ्यांचा वारंवारप्रत्येक योजनेसाठी वेगवेगळा अर्ज करणे , पुन्हा पुन्हा तीच तीच कागदपत्रे सादर करणे , त्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणे हे टाळणे गेले . आपल्या अर्जाची स्थिती online ते बघू लागले .अनुदान online त्याच्या बँक खात्यात जमा होऊ लागले .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

पीकविमा योजना :

यात अर्ज करताना जमीनधारणा क्षे त्र पडताळणी ऑ न ला इन होऊ शकल्यामुळे यातील फसवणुकीचे प्रमाण अत्यंत कमी झाले . यामुळे एक महिना कालावधीत 1 कोटी ७० लाख विमा अर्ज शेतकरी करू शकले . एका दिवसात जवळपास ६ ते ७ लाख पीकविमा अर्ज केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शक्य झाले . हे पारंपारिक पद्धतीने केवळ 15 ते २० हजार शक्य होते .

पीकविमा योजनेमध्ये राज्यात शेतकऱ्यांनी जवळपास ८८ लाख आपत्ती अंतर्गत पीक नुकसानीच्या सूचना दिल्या .त्याची माहिती केवळ कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे .पीकविमा योजनेत सहभाग घेणे . नुकसानीच्या सूचना देणे . नुकसानीचे सर्वेक्षणकरणे ,नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करणे , नुकसान भरपाई रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे हे शक्य झाले आहे . खरीप २०२३ हंगामात जवळपास 1 कोटी १३ लाख विमा अर्जदारांची आपण ७४९८ कोटी नुकसान भरपाई बँक खात्यावर करू शकलो .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

पिकांचे तांत्रिक उत्पादन निश्चिती :

भात , सोयाबीन , कापूस , गहू पिकाच्या उत्पादनाचे अंदाज आता महसूल मंडळ स्तरावर उपग्रह – तांत्रिक पद्धतीने आपण काढून पीकविमा नुकसान भरपाई निश्चिती साठी वापरात होत . ते तत्काळ उपलब्ध होतात .

नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण आणि लाभ देणे :

पिकांचे नैसर्गिक आपतीमुळे झालेल्या नुकसानाची पडताळणी नेमकेपणाने करता येऊ लागली Digital सर्वे करता येतात . माहिती जलदगतीने तयार होऊन मदत तत्काळ देणे शक्य झाले आहे .

प्रभावी अनुदान-सहाय्य वाटप :

प्राधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,नमो शेतकरी महा सन्मान योजना यात राज्यातील जवळपास एक कोटी लाभधारकांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मदतीची एकावेळी साधन रु .४००० कोटी रक्कम क्षणार्धात दिली जात आहे .

कापूस -सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटप :

खरीप २०२३ हंगामात कापूस-सोयाबीन लागवड केलेल्या शेतकर्यांना आपण सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये अत्यंत अल्पकालावधीत ई पीक पाहणी नोंदीच्या आधारे थेट बँक खात्यात मदत वाटप केली .जवळपास ६८ लाख शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर २६०० कोटींची मदत जमा करता आली.कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

पिकांवरील कीड रोगाचे सर्वेक्षणआणि सल्ला :

क्रोप्सासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून पिकांवरील कीड रोगाचे सर्वेक्षण आधारित शेतकऱ्यांना नेमकेपणाने सल्ला त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होतो . यामुळे रासायनिककीड नाशकांचा वापर कमी झाला .शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला , वातावरणाचे प्रदूषण कमी झाले .आरोग्यविषयक समस्या कमी झाल्या .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

online app द्वारे पशुगणना :

राज्यात online app द्वारे पशुगणना होत असल्यामुळे ,पशूंची माहिती जलद आणि नेमक्या पणाने उपलब्धहोत आहे .यामुळे पशुखाद्य आणि इतर पायाभूत सुविधा निर्मिती वापर प्रभाविरीतीने केला जात आहे .

दुग्ध व्यवसाय :

याबाबत दुध देणारी जनावरे , होणारे दुध उत्पादन , दुध उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने करावयाच्या नेमक्या उपाययोजना ,मागणीप्रमाणे पुरवठा ,प्रक्रिया यादृष्टीने नियोजन ,दुध भेसळीस प्रतिबंध घाले शक्य झाले आहे .

शासकीय निधीचा गैरवापरावर नियंत्रण :

शासकीय निधीचा होणारा गैरवापर ,फसवणूक याला प्रभावीरीत्या आळाघातला जात आहे.राज्यात महाग्रीटेक प्रकल्पांतर्गत पिकांखालील पेरणी क्षेत्र ,पिकांच्या पेरणीचा अहवाल ,पीक परिस्थिती ,कीड रोगांची माहिती ,हवामानाची परिस्थिती ,त्याचा पिकांवर होणारा परिणाम ,त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनीप्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक करावयाची उपाययोजना याची मोबाईल एस एम एस ,youtube चॅनेल ,टेलिग्राम , इंस्टाग्राम ,फेसबुक या माध्यमाच्या सहाय्याने प्रभावीरीत्या दिली जाते पिअक्उनच काढणी ,साठवणुकीच्या सुविधा प्रक्रिया सुविधा या बाबतची माहिती प्रभावीरीत्या उपलब्ध होऊ शकली. किमान आधारभूत किमतीवर आधारित खरेदीचे नियोजन हे करता येऊ शकले .थेट लाभ हस्तांतरण ,कृषिविषयक सर्व योजनासाठी एका ठिकाणी अर्ज सुविधा ,त्यांची ऑनलाइन लाॅटरी ,दिले जाणारे संमती पत्र ,कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष क्षे त्रीय पडताळणी ,शेतकऱ्याला तातडीने दिली जाणारी मदत या सगळ्या बाबींचे नियोजन केवळ कृत्रिम बुद्धिमतेच्या आधारे प्रभावीरीत्या केले जात आहे .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025

या क्रांतिकारी युगाचा कृषि ,दुग्ध व्यवसाय ,पशुपालन ,कृषिपूरक उद्योगांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे . यात अमर्याद संधी आहेत . यातून शेतकऱ्याचे उत्पन्न वाढीसाठी आणि त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान निश्चित वरदान ठरत आहे .कृषी उद्योगांना ए.आय.चे वरदान 2025